प्रतिनिधी
उमरखेड ,यवतमाळ
वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धनाचे महत्त्व आज सर्व जगाला कळले आहे ते महत्व विद्यार्थ्यांना सुद्धा कळले पाहिजे या उद्देशाने आज अब्दुल गफूर शहा नगरपालिका उर्दू शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करून औदुंबर वृक्ष संवर्धन समितीच्या माध्यमातून वृक्ष लागवड व संवर्धन या विषयावर शाळेच्या विद्यार्थ्यांना अगदी मोलाचे मार्गदर्शन समितीचे संस्थापक वसंतराव जाधव यांनी केले वृक्ष लागवड व संवर्धन याव्यतिरिक्त पाणी वाचवणे, ऊर्जा वाचवणे या विषयावर सुद्धा अगदी मुद्देसुद आणि विद्यार्थ्यांच्या मनामध्ये याचा विचार खोलवर पोहोचेल अशा शब्दांमध्ये अगदी योग्य मार्गदर्शन केले यावेळी शाळा परिसरामध्ये वृक्षारोपण करून ज्या विद्यार्थ्यांच्या घरी शेत आहे अशा विद्यार्थ्यांना शेतामध्ये वृक्ष लागवड करण्याकरिता वृक्ष वाटप करण्यात आले .
याप्रसंगी शाळेचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, मुख्याध्यापक व इतर शिक्षक, मोठ्या संख्येने विद्यार्थी तसेच औदुंबर वृक्ष संवर्धन समितीचे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते .
