कर वसूली साठी मात्र न.पा. प्रशासन दक्ष
उमरखेड : – उमरखेड शहरातील प्रत्येक नगर व अनेक वार्डा मध्ये विकास कामे भरपूर प्रमाणात सुरू असल्याचा दावा करून नगर पालीका प्रशासन व नेते मंडळी प्रसिद्धी माध्यमातून व विकास कामाचे फलक लावून स्वतः श्रेय घेवून शासनाची दिशाभूल करीत असल्याचे वास्तविक चित्र सध्या शहरातील रामकृष्ण नगर मध्ये दिसत आहे.
रामकृष्णनगर मधील संपूर्ण मुख्य रस्त्याने चिखलाचे व घाणीचे साम्राज्य पसरले असून रस्त्याचे पायदळ चालणे सुद्धा कठीण झाले आहे. नगर पालीका प्रशासनाला अनेक वेळा लेखी तक्रार देवून सुद्धा चिखलमय रस्त्यावर साधा मुरूम सुद्धा टाकून देण्याचे सौजन्य दाखविले नसल्याने “जगावे की मरावे”अशा संतप्त प्रतिक्रीया नगरातील रहीवाशांकडून व्यक्त होत आहेत.
शहरातील रामकृष्ण नगर मधील विकास कामे किंवा रहीवाशां साठी मुलभूत सुविधा देण्यासाठी नगर पालीका प्रशासन जाणीवपुर्वक कानाडोळा करीत आहे. नगरपालीके ने नजीकच्या मोहन नगर व आनंद नगर मध्ये पक्के रस्ते, नाल्या बनवून व विद्यूत खांबावरील पथदिवे लावले मात्र मागील दहा वर्षापासून नगरी मध्ये शंभर च्या वर वास्तव्यास घरे असलेल्या कुटूंबांना नागरी सुविधा देण्यास नगर पालिका प्रशासन अद्याप असमर्थ ठरली आहे. पावसाळ्याच्या दिवसा मध्ये सर्व रस्त्या वर चिखल होत असल्याने शाळकरी विद्यार्थ्यांना शाळेत जाताना रस्त्याने चालणे सुद्धा कठीण झाले आहे.
तसेच सापाचे सुद्धा वास्तव्य मोठ्या प्रमाणात घाणीमुळे व सुसज्ज नाल्या-अभावी वाढले आहे
इंग्रजी माध्यमातील शाळे- मध्ये शिकणाऱ्या लहान लहान बालकांसाठी असलेली स्कूल बस किंवा ॲटो चिखलामुळे नगर मध्ये येत नसल्याने लहान बालकांना २ ते ३ कि.मी. चा प्रवास पायदळ करावा लागत आहे. या रस्त्याने अनेक वेळा दुचाकी स्वारांचा अपघात होवून गंभीर स्वरूपाच्या इजा झाल्या आहेत.रस्त्यावरील काही पथ दिवे बंद असल्याने रात्री च्या वेळी या रस्त्या वर चिखलाचे साम्राज्य व नेहमी रस्त्यावर विषारी सापांचा वावर असल्याने अंधारात जिव धोक्यात घालून कामगार वर्ग व अनेकांना शहरातून या रस्त्या ने घरा पर्यंत येणे नित्या चे झाले आहे. अनेक वेळा दुरावस्था असलेल्या रस्त्या बाबत नगर पालीका प्रशासनाला लेखी निवेदन दिली आहेत परंतू अद्यापही नगर पालीका प्रशासनाने नगरी मधील रस्ता दुरूस्ती व मुलभूत . सुविधा देण्या चे सौजन्य दाखविले मात्र कर वसूली साठी तुघलकी दराने कर आकारून नेहमी दक्ष असल्याचे सौजन्य नगर पालीका प्रशासनाने दाखविले आहे.