शेतकऱ्यांच्या वतीने केंद्रीय अर्थमंत्री भागवत कराड यांना निवेदन
औरंगाबाद : वैजापूर तालुक्यातील लासुरगाव सर्कल मध्ये अतिवृष्टी झाल्याने येथील रस्ते पूल वाहून गेले त्यामुळे शेतरस्ते पूल बंधारे दुरुस्त करा या मागणीचे निवेदन शेतकऱ्यांच्या वतीने उपविभागीय अधिकारी वैजापूर तथा केंद्रीय अर्थमंत्री भागवत कराड यांना देण्यात आले
वैजापूर तालुक्यातील लासुरगाव सर्कल मध्ये 159मी मी.इतका पाऊस पडल्यामुळे येथील नदया नाले तुडूंब भरले असून शेतकऱ्यांच्या पिकाचे अतोनात नुकसान झाले असून येथील वस्त्या शेत रस्ते नदया वरील पूल बंधारे फूटलयाने येथील शिवना,ढेकु आदी नदया ना पूर आले आणि या पुराच्या पाण्याने येथील रस्ते खराब झाले असून या रस्त्याची अवस्था अंत्यत दयनीय झाली असून लासुरगाव येथील राहेगाव रोड ते श्रीखंडे वस्तीवरील रस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी उपविभागीय अधिकारी वैजापूर तसेच केंद्रीय अर्थमंत्री भागवत कराड यांना निवेदन देण्यात आले यावेळ ग्राम पंचायत सदस्य सौ.रेखा विजय श्रीखंडे, सौ माधुरी नामदेव अगवणे, सोमनाथ अगवणे, वाल्मीक श्रीखंडे ,सुरेश तुळशीराम सोनवणे,चांगदेव अगवणे,प्रभाकर सपकाळ, अशोक श्रीखंडे, पांडुरंग श्रीखंडे,सागर अगवणे,नाना लोकांक्ष,बाळू धुदाट आदीची उपस्थिती होती
प्रतिनिधी रमेश नेटके
वैजापूर औरंगाबाद