औरंगाबाद : संभाजीनगर येथे भारतीय जनता पक्षाची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये बुथ समिती गठण व सेवा समर्पित अभियान अंतर्गत पक्षाने दिलेले सर्व कार्यक्रम यशस्वीरित्या खुलताबाद तालुक्याने जिल्ह्यात सर्वप्रथम पार पाडले असून संभाजीनगर ग्रामीण मध्ये खुलताबाद- रत्नपुर तालुक्याने सर्व गावातील 95 बुथसमितीची 1+30 याप्रमाणे नाव,मोबाईल नंबरसह यादी तयार करून आज संभाजीनगर ग्रामीण चे प्रभारी केंद्रीय अर्थ राज्य मंत्री मा. खा. डॉ.भागवतजी कराड साहेब, माजी विधानसभा अध्यक्ष मा. आमदार हरिभाऊ बागडे नाना, व जिल्हाध्यक्ष विजयजी औताडे याच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आली. जिल्ह्य़ात सर्व प्रथम यादी तयार करून दिल्याबद्दल खुलताबाद- रत्नपुर तालुकाध्यक्ष प्रकाश वाकळे यांचा केंद्रीय अर्थ राज्य मंत्री मा. खा. डॉ.भागवतजी कराड साहेब, माजी विधानसभा अध्यक्ष आ.हरिभाऊ बागडे नाना व जिल्हाध्यक्ष विजय औताडे यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला, यावेळी मंचावर भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

याप्रसंगी माननीय आमदार प्रशांत भाऊ बंब व जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष एलजी गायकवाड यांनी तालुका अध्यक्ष प्रकाश जी वाकळे यांचे अभिनंदन केले, यांच्यासह पंचायत समितीचे सभापती श्री. गणेश नाना आधाने, उपसभापती श्री. युवराज ठेगंडे, नगर परिषदेचे उपअध्यक्ष श्री. सुरेश मरकड, जिल्हा परिषद चे माजी सभापती श्री. भीमरावजी खंडागळे, जिल्हा सरचिटणीस ज्ञानेश्वर नलावडे, पंचायत समितीचे माजी उपसभापती दिनेश अंभोरे, पंचायत समिती सदस्य प्रकाश पाटील चव्हाण, प्रभाकर शिंदे, शहराध्यक्ष सतीश दांडेकर, नगरसेवक नवनाथ बारगळ, परसराम बारगळ ,योगेश बारगळ ,अविनाश कुलकर्णी, आशिष कुलकर्णी, शिवाजी गायकवाड,रावसाहेब देशमुख, अंकुश काळे ,संतोष गायकवाड आदी पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी भाजपाचे तालुकाध्यक्ष प्रकाश वाकळे यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
Ntv न्यूज मराठी योगेश शेळके खुलताबाद औरंगाबाद.