छत्रपती संभाजीनगरमध्ये स्वदेशी एक्स्पोच्या उद्घाटनाला उपस्थित राहिलेल्या क्रीडा व युवा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी हातमागाची कला जपण्यासोबतच क्रीडा क्षेत्राच्या विकासावरही भाष्य केले. देशातील पारंपरिक कला आणि क्रीडा परिसंस्था मजबूत करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

हातमागाची कला आणि विविध राज्यांच्या पारंपरिक हस्तकलेचे संरक्षण करणे आवश्यक असल्याचे रक्षा खडसे यांनी सांगितले. प्रदर्शनांमुळे कलाकारांना योग्य व्यासपीठ मिळते, तसेच टेक्स्टाइल क्षेत्राला पुढे नेण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

युवा मंत्रालयाच्या ‘माय भारत’ पोर्टलवर अडीच कोटी युवकांनी नोंदणी केल्याची माहिती त्यांनी दिली. युवक आणि क्रीडा शिक्षणाच्या बजेटमध्ये सात पटीने वाढ झाल्याचा दावाही त्यांनी केला.

खेळाडू घडवण्यासाठी स्पोर्ट्स सायन्स महत्त्वाचे असून, प्रत्येक जिल्ह्यात स्पोर्ट्स सायन्स स्कूल सुरू करण्याचा सरकारचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले.

केवळ क्रीडा सुविधा उभारणे पुरेसे नसून, प्रशिक्षक आणि देखभालीसह संपूर्ण ‘स्पोर्ट्स इकोसिस्टिम’ मजबूत करण्याची गरज असल्याचे रक्षा खडसे यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *