गुलाबी गॅंगने पैशाची उधळपट्टी कशी लावली आहे, हे आपण पाहत आहोत. सरकारच्या पैशावर हे यात्रा काढतात, गर्दी गोळा करतात. यात्रा काढण्यासाठी जी एजन्सी आहे, त्या डिझाईन बॉक्सला अजित पवार पक्षाने २०० कोटी रुपये दिल्याचा आरोप आमदार रोहित पवारांनी केला आहे.

आमदार रोहित पवार यांनी इंदापूर येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेवर टीका केली. अंगणवाडी सेविकांना दम देऊन लोकांना आणायला सांगितले होते, असेही रोहित पवार म्हणाले. आम्हाला गुलाबी वादळाची चिंता नाही, असं म्हणत रोहित पवारांनी अजित पवारांना टोला लगावला. पण आज या सरकारने नीट न काम केल्यामुळं जे वादळ आलं आहे, ते मिटवण्यासाठी आज आम्ही इथे सगळे लढत आहोत, असंही रोहित पवार म्हणाले.
