छत्रपती संभाजीनगर,
२९ सप्टेंबर २०२४ रोजी संविधान जागर साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. छत्रपती संभाजीनगर येथे मोठ्या उत्साहात हे संमेलन संपन्न होणार आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी जेष्ठ विचारवंत अँड. शाम तांगडे यांची निवड करण्यात आली आहे. आंबेडकरी चळवळीतील एक प्रतिष्ठित कार्यकर्ता म्हणून ओळखले जाणारे अँड.शाम तांगडे हे १९७० पासून आंबेडकरी चळवळीत सक्रीय आहेत. त्यांनी दोन शासकीय नोकर्या केल्या,परंतु समाजविकासाचा ध्यास त्यांना शांत बसू देईना म्हणून त्यांनी नोकरीं सोडली आणि आपले संपूर्ण आयुष्य आंबेडकऱी चळवळीला समर्पित केले आहे. या साहित्य संमेलनाच्या उद्घाटनासाठी प्रा.अंजलीताई आंबेडकर उपस्थित राहणार आहेत, तर समारोपाच्या कार्यक्रमात अँड. बाळासाहेब आंबेडकर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असतील. संमेलनाचे मुख्य स्वागत अध्यक्ष, प्रसिद्ध समाजसेवक, धम्मसेवक डॉ. प्रमोद दुथडे हे असणार आहेत. या महत्त्वपूर्ण संमेलन संत एकनाथ नाट्य मंदिर, छत्रपती संभाजीनगर येथे संपन्न होणार आहे.
संविधान जागर साहित्य संमेलनाचे आयोजन फुले- आंबेडकर विद्वत सभा संभाजीनगर यांच्या वतीने करण्यात आले आहे. या संमेलनात विविध सामाजिक, सांस्कृतिक, आणि साहित्यिक विषयांवर चर्चा होणार असून, संविधान आणि सामाजिक न्याय या मुद्द्यांवर विशेष लक्ष केंद्रित केले जाणार आहे. समाजातील विविध विचारवंत, लेखक, आणि सामाजिक कार्यकर्ते या संमेलनात सहभाग घेणार आहेत. हे संमेलन समाजात संविधानाच्या महत्त्वाची जाणीव वाढविण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. अँड. शाम तांगडे यांच्या अध्यक्षतेखाली हे संमेलन यशस्वी करण्यासाठी आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी विशेष सहकार्य करण्याचे आवाहन फुले-आंबेडकर विद्वत सभेचे पदधिकारी प्रा. डॉ. प्रज्ञा साळवे, प्रा. भारत सिरसाट, डॉ. संजय मुन, रतनकुमार साळवे,संयोजन समितीचे के. ई. हरदास,धनराज गोंडाने, डॉ. यशवंत खडसे, सविता अभ्यंकर, अशोक जोहरे, प्रा. संजय साळवे, प्रा. मोहन सौन्दर्य, डॉ सुधाकर दिवेकर, डॉ. मिलिंदराज बुक्तरे, दादाराव त्रिभुवन, सुनील पुंडकर, शैलेंद्र मिसाळ, एस. के. बावस्कर, अँड. संघपाल भारसाखळे, दैवशीला गवांदे, शारदा पगारे, प्रा.संगीता अंभोरे, समाधान सुरडकर, गंगा सुरडकर, अँड शारदा गायकवाड, डॉ. संजय खरात,भीमराव गाडेकर, गौतम वाघ, साहेबराव सिरसाट, अमरदीप वानखडे,अँड. विजय वानखेडे,आदीसह समितीच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.
N TV न्युज मराठी रिपोर्टर जब्बार तडवी छत्रपती संभाजीनगर