(सचिन बिद्री:धाराशिव)

राष्ट्रीय/राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार देवून शासनाद्वारे विविध शिक्षकांना दरवर्षी सन्मानित केले जाते. परंतु या पुरस्कार प्राप्त शिक्षकांचे अनेक प्रश्न प्रलंबीत असल्याने सदर प्रश्नांसंदर्भात शासन स्तरावर पाठपुरावा करणे बाबत धाराशिव जिल्ह्यातील राष्ट्रीय/राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांच्या शिष्टमंडळाने उमरगा लोहारा विधानसभा क्षेत्राचे आमदार ज्ञानराज चौगुले यांची भेट घेत निवेनाद्वारे मागणी केली.
या निवेदनात राष्ट्रीय/राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांना कायम स्वरुपी ओळखपत्र देणे, पदोन्नती प्रक्रियेत किमान २०% आरक्षण देणे, बंद झालेल्या दोन जादा वेतनवाढ मंजूर करणे, राष्ट्रीय/राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षकांना वार्षिक सर्वसाधारण बदल्यांमध्ये संवर्ग १ नुसार समाविष्ट करणे, शासन व जि.प.च्या विविध समित्यांवर सदस्य म्हणून निवड करणे यासह बस व रेल्वे प्रवास मोफत करणे आदी मागण्या करण्यात आल्या.
या मागण्यांच्या अनुषंगाने आमदार ज्ञानराज चौगुले यांनी राष्ट्रीय राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्न मार्गी लावणार असल्याचे यावेळी आश्वासन दिले.
यावेळी राष्ट्रीय/राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त विक्रम बलभिमराव पाचंगे, भैरवनाथ कानडे,बालाजी इंगळे,बळीराम घोरवडे, सरीता उपासे,सुभाष वैरागकर आदी शिक्षक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *