लातूर : सकल धनगर समाजाच्यावतीने गेल्या सात दिवसांपासून धनगर एसटी आरक्षण अंमलबजावणीसाठी उपोषणाला बसलेल्या मल्हार योद्धे अनिल गोएकर व चंद्रकांत हजारे यांच्या मागणीला मनसेने पाठिंबा दिला. मनसेचे जिल्हाध्यक्ष डॉ. नरसिंह भिकाणे यांनी लातूर येथील उपोषण स्थळी भेट देवून हा पाठिंबा दिला. धनगड व धनगर या दोन जाती एकच आहेत. कारण धनगड ही जात महाराष्ट्रात अस्तित्वात नाही.
♦️वर्षानुवर्षे हे आंदोलन फक्त एवढ्या एक अक्षरी खेळावर चालू आहे. परंतु, शासन यावर नेहमीप्रमाणे वेळकाढूपणा करून सकल धनगर समाजाच्या भावनांशी खेळत आहे, असा आरोप करुन डॉ. भिकाणे यांनी सरकारच्या वेळकाढू धोरणाचा निषेध नोंदविला. धनगर बांधवांच्या आरक्षणाच्या या मागणीसाठी कुठल्याही लढाईत उतरणार असल्याची ग्वाही यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष डॉ. नरसिंह भिकाणे यांनी दिली. यावेळी लातूर शहराध्यक्ष मनोज अभंगे उपस्थित होते.