♦️जिल्ह्या परिषदेची ऑनलाइन सुरू झालेली प्राथमिक शिक्षकांच्या बदलीची प्रक्रिया नुकतीच पार पडली. यात जिल्ह्यातील २३४ शिक्षकांच्या बदल्या झाल्या असून संवर्ग १ मध्ये १०७, पती-पत्नी एकत्रिकरणात ४३, अवघड क्षेत्रातून १४, ज्येष्ठता क्रमाने ७० शिक्षकांचा समावेश आहे.

♦️शिक्षक संघटनाच्या मागणीची दखल घेत अखेर मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी बदल्याची प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेतला. यंदा जिल्ह्यात बदलीसाठी ३ हजार ८०० शिक्षकांनी अर्ज केले होते. मात्र, यात २३४ शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या. यंदाची बदलीची प्रक्रिया एकाच वेळी आणि पारदर्शक पार पडली. बदली प्रक्रियेमुळे बदली पात्र शिक्षकांनी समाधान व्यक्त केले.
