♦️बाप्पाला निरोप देण्यासाठी पोलिस विभागाकडून तयारी पूर्ण करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली ड्रोन कॅमेरे, सीसीटीव्ही कॅमेर्‍यासह सुमारे साडेतीन हजार पोलीस व होमगार्ड यांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

♦️पोलिस विभागाकडून तयारी पूर्ण
नगर जिल्ह्यात सुमारे तीन हजार गणपती मंडळांनी गणेशाची स्थापना केली आहे. उद्या (मंगळवारी) अनंत चतुर्दशीच्या दिवशी बाप्पाला निरोप देण्यात येणार आहे. त्यासाठी २ अपर पोलीस अधीक्षक, ७ पोलीस उपअधीक्षक, ३७ पोलीस निरीक्षक, ६३ सहायक व उपनिरीक्षक, १५३५ पोलीस कर्मचारी, ९४७ होमगार्ड,
◼️आरसीपी’च्या तीन तुकड्या,
◼️क्यूआरटी’च्या दोन तुकड्या,
◼️एसआरपीएफ’ची एक कंपनी,
◼️आरएएफ’ची एक कंपनी,
◼️स्ट्रगींग फोर्स १०,
◼️साध्या वेशातील पोलीस पथके
◼️छेडछाड विरोधी पथक,
◼️ध्वनी प्रदूषण पातळी मोजण्यासाठी स्वतंत्र पथक असणार आहे.