अहमदनगर :– अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात श्री.क्षेत्र भोसे येथे लोकसहभागातून अतिशय सुंदर असे मंदिर उभारण्यात आले असून या मंदिरामध्ये प्रभू श्रीरामांच्या मूर्तीसह राष्ट्रसंत भगवान बाबा,संत वामनभाऊ महाराज यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार असून या मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त तीन दिवसीय कीर्तन सोहळा देखील आयोजित करण्यात आला आहे.याची सुरुवात बुधवार दिनांक 4 डिसेंबर 2024 पासून होत आहे.लक्ष्मण महाराज कराड,सुदर्शन महाराज शास्त्री,पंढरीनाथ महाराज टेमकर,पांडुरंग महाराज फसले,शरद महाराज वारे यांच्या मार्गदर्शनाखाली हा तीन दिवसीय कीर्तन सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

♦️बुधवारी सायंकाळी सात वाजता राधाताई महाराज सानप यांची कीर्तन सेवा होणार आहे तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच गुरुवारी सायंकाळी 4 ते 6 यावेळेत प्रभू श्रीराम,राष्ट्रसंत भगवान बाबा,संत वामनभाऊ महाराज यांच्या मूर्तीची भव्य दिव्य मिरवणूक होणार असून त्यानंतर सात वाजता शिवशाहीर कल्याण महाराज काळे यांची कीर्तन सेवा होणार आहे तर शुक्रवार दिनांक 6 डिसेंबर रोजी सकाळी भव्य दिव्य मंदिरामध्ये प्रभू श्रीराम,राष्ट्रसंत भगवान बाबा,संत वामनभाऊ महाराज यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा महंत डाॅ.न्यायाचार्य नामदेव महाराज शास्त्री यांच्या शुभहस्ते होणार असून यावेळी महंत आदिनाथ महाराज शास्त्री,संत चरणरज छगन महाराज मालुसरे,लक्ष्मण महाराज कराड,ज्ञानेश्वर महाराज कराळे,पंढरीनाथ महाराज टेमकर,योगेश महाराज शिंदे,बापूसाहेब महाराज शिंदे,संजय महाराज वारे,पांडुरंग महाराज फसले यांच्यासह संत महंत उपस्थिती राहणार आहेत.तसेच महंत डाॅ.न्यायाचार्य नामदेव महाराज शास्त्री यांचे सकाळी नऊ वाजता काल्याचे किर्तन होणार आहे.

♦️त्यानंतर भरत दामोदर वारे यांच्या वतीने महाप्रसादाची पंगत होणार आहे.या परिसरातील सर्व भाविक भक्तांनी कीर्तन सेवेचा,मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा आवर्जून लाभ घ्यावा असे आवाहन भोसे ग्रामस्थ व भजनी मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. 

प्रतिनिधी :– भिवसेन टेमकर Ntv न्यूज मराठी पाथर्डी,अहमदनगर.मो.नं.9373489851.