सामाजीक कार्याचा वसा घेतलेल्या भगत यांचा सहपरिवारासह विविध मान्यवरांच्या हस्ते सन्मान
विविध मान्यवरांच्या ऊपस्थीतीत गडचिरोली येथील आर के सेलिब्रेशन हाॅल येथे पार पडला पुरस्कार सोहळा
वाशिम:-आपल्या सामाजिक कार्याचा ठसा जनमानसात रुजवणारे निर्भीड पञकार म्हणून नावलौकीक असलेले फुलचंद भगत यांना ‘महाराष्ट आयकाॅन पुरस्कार-२०२४ हा दि.३० नोव्हेंबर रोजी गडचिरोली येथे आर के सेलिब्रेशन हाॅलमध्ये झालेल्या दिमाखदार सोहळ्यात विविध मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार सहपरिवाराला प्रदान करण्यात आला आहे.सदर पुरस्कारामुळे अधिक जोमाने विधायक कार्य करण्याचे बळ मिळेल असे भावनिक उद्गार यावेळी भगत यांनी व्यक्त केले असुन त्यांचे सर्वस्तरातुन कौतुक होत आहे.
यहोवा यिरे फाऊंडेशन व कलाजीवन बहुउद्देशीय संस्था महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने सदर पुरस्कार सोहळा दि.३० नोव्हेंबर रोजी गडचिरोली येथील आर के सेलिब्रेशन हाॅलमध्ये हा ‘महाराष्ट आयकाॅन अवार्ड’चा दिमाखदार सोहळा आयोजीत केला होता.यवोव्हा यिरेचे डायरेक्टर आणी सिईओ प्रा.डाॅ.रमेशकुमार बोरकुटे,मिसेस बोरकुटे मॅडम,श्री. भयप येरमे. सहाय्यक आयुक्त, कौशल्य विकास एम्प्लॉयमेंट इनोव्हेशन ब्युरो, चंद्रपूर आणि श्री महेंद्र चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदुरबार,लावणी सम्राज्ञी शिल्पा शाहीर,डाॅ.सोनाली खञी,आंतरराष्टीय मेकअप आर्टीष्ट पुनम गोकुलपुरे,माॅडेल आणी अभिनेञी महिशा मडावी,डि.के.अहिरकर,गौतम कोटवाल यांचेसह अधिकारी,विविध क्षेञातील नामवंत मान्यवर,सामाजिक क्षेञातील व्यक्तीमत्व तसेच आर्टिष्ट यांची विषेश ऊपस्थीती होती.शासन प्रशासन तसेच जनता यामधील दुवा बनुन व विविध शासकिय योजना गरजु व पाञ लाभार्थ्यापर्यत पोहचवण्यासाठी मदत करणे,शेतकरी,कष्टकरी,विद्यार्थी आदी घटकांना न्याय मिळवुन देण्यात भगत यांचा नेहमी पुढाकार घेत असतात.गोरगरिबांना सदैव मदतीचा हात देवुन महिला सक्षमीकरणासाठी,लोकहित जोपासत विविध सामाजिक प्रश्नावर आपल्या लेखणीव्दारे प्रकाश टाकुन न्याय मिळवुन देण्याची भुमिका पञकार फुलचंद भगत यांची असल्याने त्यांना आतापर्यत मिळालेले पुरस्कार त्यांच्या कार्याचा गौरव असल्याचे अनेकांनी कौतुक केले आहे.यंदाचा राज्यस्तरीय ‘महाराष्ट आयकाॅन पुरस्कार विविध क्षेञातील नामवंत मान्यवरांच्या ऊपस्थीतीत दि.३० नोव्हेंबर रोजी गडचिरोली येथे पार पडलेल्या दिमाखदार सोहळ्यात सदर पुरस्कार हा परिवारासह पञकार फुलचंद भगत,सौ.प्रज्ञा भगत,कु.स्वरा भगत यांना प्रदान करण्यात आला आहे.हा पुरस्कार मिळाल्यामुळे सर्व स्तरातुन कौतुकाचा वर्षाव होत आहे.