मा.जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचा निकाल

फुलचंद भगत
वाशिम:-घरगुती गॅस सिलेंडर स्फोट प्रकरणात तक्रारकर्तीला मा. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग वाशीम चा दिलासा
मिळाला आहे.
न्यू सोनखास माधव नगर मंगरुळपीर येथील रहिवासी कीर्तिका राजेंद्र ठाकरे ह्यांच्या निवास स्थानी दिनांक ०४/०८/२०२२ रोजी ह्यांचे घरगुती वापराच्या सिलेंडरचा स्फोट झाला होता व त्यामध्ये तक्रारकर्तीचे अतोनात आर्थिक नुकसान झाले होते सदरहू घटनेमुळे झालेल्या नुकसानाची भरपाई मिळण्याकरिता तक्रारकर्तीने जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग वाशीम येथे तक्रार नोंदविली होती सदर प्रकरणात आयोगा समोर विरोधी पक्षांनी दाखल होऊन लेखी उत्तर सादर केले त्यानंतर दोन्हीही पक्षांचा लेखी ताठ तोंडी युक्तिवाद ऐकून माननीय अध्यक्ष श्रीमती वैशाली गावंडे ह्यांनी तक्रारकर्तीला झालेल्या नुकसानाची भरपाई पोटी नुकसान भरपाईची रक्कम ९% व्याजासह तक्रार दाखल करण्याच्या तारखेपासून अदा करण्याचा आदेश दिनांक ०८/11/2024 रोजी विरोधी पक्षांविरुद्ध पारित केला.सदर प्रकरणात ऍड. कौस्तुभ भिसे व ऍड ए. डी. रेशवाल यांनी तक्रारकर्ती तर्फे माननीय आयोगा समोर कामकाज पाहीले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *