फुलचंद भगत
वाशिम:-मंगरुळपीर येथील स्व.श्री. वसंतराव नाईक सार्वजनिक ग्रंथालय व नाथ विद्यालय मंगरूळपीर यांचे संयुक्त विद्यमाने वाचन संकल्प महाराष्ट्राचा हा कार्यक्रम दि.७ जानेवारी रोजी विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून संपन्न झाला.


सदर कार्यक्रमात नाथ विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी वाचन संकल्पनेचा प्रसार व्हावा या करिता शहरातील काही मुख्य रस्त्यावरून ग्रंथदिंडी काढली. यानंतर ग्रंथालयाच्या भव्य सभागृहात विद्यालयाच्या 250 पेक्षा जास्त विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांनी सामूहिक वाचन केले. या वेळेस कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्र शासनाचे ग्रंथ मित्र पुरस्कार प्राप्त संस्थेचे सचिव बी.पी. पवार माजी प्राचार्य डॉक्टर जयंत बोबडे व नाथ विद्यालय मंगरूळपीरचे मुख्याध्यापक ए. के. पवार या मान्यवरांनी विद्यार्थ्यांना वाचन संकल्प महाराष्ट्राचा या कार्यक्रमांविषयी सविस्तर माहिती देऊन विद्यार्थ्यांनी वाचन करून आपला व्यक्तिगत विकास करावा याविषयी मार्गदर्शन केले. यानंतर ग्रंथालयात भव्य ग्रंथ प्रदर्शनीचे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले यावेळी नाथ विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी व मंगरूळ शहरातील मान्यवर नागरिकांनी या ग्रंथ प्रदर्शनीला भेट दिली.

या कार्यक्रमाचे संचालन आर. डी. भोयर व आभार प्रदर्शन प्राध्यापक शिवराज कुंडगीर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी ते साठी नाथ विद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच स्व. श्री वसंतराव नाईक सार्वजनिक ग्रंथालयाचे ग्रंथपाल गोविंद राठोड व कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *