फुलचंद भगत
वाशिम:-वाशिम जिल्हयातील चोरी, घरफोडी, दरोडा सारख्या गुन्हयातील तसेच मोबाईल, मोटार सायकल व इतर किंमती साहीत्य चोरीच्या गुन्हयातील अथवा नागरीकांकडुन गहाळ झालेला किमती मुद्देमाल पोलीस विभागाकडुन सर्व तपास कौशल्य पणास लावुन मुद्देमाल हस्तगत करुन गुन्हे उघडकीस आणले जातात गुन्हयातील हस्तगत मुद्देमाल पोलीस विभागाकडे मालखान्यात पडुन राहतो.

सदर मुद्देमाल फिर्यादीस परत मिळाल्यास अगोदरच मालमत्तेच्या नुकसानीमुळे त्रस्त असलेल्या फिर्यादींना दिलासा मिळेल व पोलीस जनता सलोखा निर्माण होवुन जनतेशी विश्वासपुर्ण संबंध निर्माण होतील, संबंधीत गुन्हयातील मुद्देमाल हा मुळ मालकांना परत मिळाला पाहीजे त्यासाठी फिर्यादीला त्यांचा किंमती एैवज लवकर मिळाला किंवा सुलभ व्हावे या कल्पनेतुन
पोलीस स्थापना दिनाचे अनुषंगाने दि. २ जानेवारी ते ८ जानेवारी रेझींग डे सप्ताह साजरा केल्या जातो त्या निमीत्ताने सदर कालावधीमध्ये पोलीस विभागातर्फे वेगवेळया कार्यक्रमांचे आयोजन केल्या जाते. दि.०७.०१.२०२५ रोजी मा. पोलीस अधीक्षक वाशिम श्री. अनुज तारे यांचे संकल्पनेतुन फिर्यादीस मुद्देमाल वितरण समारंभ चे नियोजनबध्द पध्दतीने आयोजन करण्यात आले. मुद्देमाल वितरण समारंभामध्ये ६९ गुन्हयातील सायबरचे ३०४ प्रकरणांतील एकुण ३८६ मुद्देमाल वितरीत करण्यात आला ज्यामध्ये

सोन्याचांदीचे दागीने १६,०५, १८८ /- रुपये, ३२ मोटार सायकल १३,१०,००० /- रुपये, ३०४ मोबाईल ३०,००,००० /- रुपये, तार ३,२०० /- रुपये,नगदी १४,५८,००० /- रुपये,८ चारचाकी वाहने ५१,२०,००० /- रुपये, धान्य ९६,४००/- रुपये,
घरगुती व इतर साहीत्य २,९४,१८५ /- रु.असा एकुण १,२८,८६,५७३ /- रुपयांचा मुद्देमाल फिर्यादीस परत करण्यात आला आहे. चोरी गेलेल्या एवढा मोठया रक्कमेचा मुद्देमाल परत करण्याची वाशिम जिल्हयाच्या इतिहासातील ही पहीलीच वेळ आहे. आजच्या मुद्देमाल वितरण समारंभाला मिळालेला प्रतिसाद तसेच मुद्देमाल परत केल्यामुळे फिर्यादींचे / पिडीताचे चेह-यावर दिसनारा आनंद सर्वांना पाहण्याजोगा होता. फिर्यादींनी त्यांचे मनोगत व्यक्त करतांना समाधान व्यक्त करुन पोलीस विभागाचे आभार मानुन शुभेच्छा दिल्या.नागरीकांच्या हिताच्या दृष्टीने आवश्यक असणा-या लोकउपयोगी कार्यक्रमांचे आयोजन वेळोवेळी करणार असल्याचे मा. पोलीस अधीक्षक श्री अनुज तारे यांनी सांगीतले आहे.
