फुलचंद भगत
वाशिम:-मंगरूळपीर येथील समाजसेवक महादेवराव ताटके यांचे दि 7 रोजी सकाळी 10 वाजता निधन झाले आहे.
समाजसेवक महादेवराव ताटके 2007 मध्ये विधानसभा निवडणूकीत अपक्ष उभे होते या निवडणुकीत त्यांना भरघोस मते मिळाली होती याशिवाय त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत 2009 मध्ये ते जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्यांच्या पत्नीला निवडून दिले होते एवढेच नव्हे तर गतकाळात सामाजिक बांधिलकी हा दृष्टिकोन समोर ठेवून विविध समाजोपयोगी उपक्रम राबवले त्यामध्ये चिकनगुनिया सारख्या आजारात रुग्णावर उपचार करण्यासाठी संपूर्ण तालुक्यात चिकनगुनिया मुक्त अभियान राबवून अनेकांना आजार मुक्त केले होते, 2006 मध्ये वाशिम जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांना वाटर बॅगचे वितरण केले होते त्यांनी अनेक गोरगरीब जनतेला आर्थिक मदत सुद्धा केली होती त्यांच्या निधनामुळे समाजात खूप मोठी पोकळी निर्माण झाली आहे.मृत्यू समयी त्यांचे वय 57 वर्षाचे होते त्यांच्या पश्चात पत्नी व तीन मुले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *