♦️आंध्र प्रदेशमधील तिरुपती मंदिरात काल (बुधवारी) चेंगराचेंगरी होऊन सहा जणांचा मृत्यू झाला तर ४० जण जखमी झाले आहेत. जखमींवर तिरुपती येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. एकाच वेळी दर्शनाचे टोकन मिळवण्यासाठी झालेल्या गर्दीतून ही घटना घडली.


♦️माहितीनुसार, दर्शनाचे टोकन घेण्यासाठी हजारो भाविक वैकुंठ गेटवर रांगेत उभे होते. मात्र, अचानक चेंगराचेंगरी झाल्याने सहा जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये एका महिलेचाही समावेश आहे. तर ४० जण या अपघातात जखमी झाले असल्याचे समजते. या अपघातावर मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी शोक व्यक्त केला. तिरुपतीमध्ये वैकुंठद्वार १० दिवसांसाठी दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे. त्यामुळे काल (बुधवारी) मंदिरात टोकन घेण्यासाठी हजारो लोकांची गर्दी झाली होती.