बिडकीन दि ११ जानेवारी महाराष्ट्र शासनाने राबवलेल्या मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धेत पैठण तालुक्यातून श्री.सरस्वती भुवन प्रशाला बिडकीन प्रशालेने प्रथम क्रमांक पटकावून तीन लाख रुपयांचे पारितोषिक प्राप्त केले आहे.

या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ सभागृहात संपन्न झाला. या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवल्या बदल जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातर्फे सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र राजस्थानचे राज्यपाल हरीभाऊ बागडे,विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, मुख्यकार्यकारी अधिकारी
डॉ.विकास मिना, शिक्षण उपसंचालक अनिल साबळे,माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी अश्विनी लाटकर, प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले.
शिक्षण विभागाच्या तालुकास्तरीय कमिटीने गुणांकनाच्या आधारे शाळेचे मूल्यमापन केले. यामध्ये शाळेची गुणवत्ता, भौतिक सुविधा, विद्यार्थी लाभाच्या प्रभावीपणे राबवलेल्या योजना,इको क्लब,सोलर सिस्टीम,शंभर टक्के विद्यार्थी आधार, परसबाग,शाळेने राबवलेले प्रभावशाली उपक्रम यांचा विचार या मूल्यांकनामध्ये करण्यात आला.प्रशालेने मिळवलेल्या या यशाबद्दल श्री.सरस्वती भुवन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अँड दिनेशजी वकील, डॉ श्रीरंग देशपांडे, बाळकृष्ण क्षीरसागर, डॉ रश्मी बोरीकर, अँड रामेश्वर तोतला, डॉ.सुनिल देशपांडे, मिलिंद रानडे, , शालेय समितीचे अध्यक्ष किसनलाल तोतला, यांनी मुख्याध्यापक धर्मेंद्र येवले उपमुख्याध्यापक युवराज पाडळे , ज्ञानेश्वर चाटूपळे,सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी यांचे अभिनंदन केले आहे.
NTV NEWS MARATHI बिडकीन प्रतिनिधी अलीम शेख छत्रपती संभाजीनगर