यवतमाळ, 12 जानेवारी 2025
राजमाता जिजाऊ माँसाहेब, युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त यवतमाळ शहरात छत्रपती सेवा प्रतिष्ठान आणि मराठा सेवा संघाच्या संयुक्त विद्यमाने जिजाऊ जन्मोत्सवाचा भव्य उत्सव आज शिवतीर्थ,छत्रपती शिवाजी महाराज स्मारक परिसर,गार्डन रोड,बस स्टॅन्डजवळ आज दिनांक 12 जानेवारी(रविवार) रोजी संपन्न झाला.सकाळी 9 वाजता जिजाऊ वंदना आणि अभिवादनाने उत्सवाची सुरुवात झाली.यानंतर रांगोळी,चित्रकला,आणि वेशभूषा स्पर्धा उत्साहात पार पडल्या.कार्यक्रमाला अनेक मान्यवरांनी हजेरी लावली,ज्यामध्ये सहआयुक्त ओमप्रकाश नगराळे,पोलीस निरीक्षक रामकृष्ण जाधव आणि संजय पवार,माजी नगरसेवक प्रा.डॉ.बबलू उर्फ अनिल देशमुख,काँग्रेस प्रवक्ते प्रा.प्रवीण देशमुख,छत्रपती शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष अजय गावंडे,सिनेट सदस्य अमरावती विद्यापीठ विजय मोघे,दैनिक साहसीक वृत्तपत्राचे जिल्हा प्रतिनिधी दीपक यंगड,आशा काळे,अनिता गरड,स्नेहा निंबाळकर,वैशाली पिसाळकर,रूपाली वानखडे,रोशनी चौधरी,नीता देशमुख,स्नेहल रेचे,प्रा. सोनल देशमुख,अंकुश वानखडे,पंकज राऊत,उल्हास रणनवरे,वैभव रिठे,गौरव गावंडे,उदय सरतापे,प्रद्युम्न जवळेकर,श्रीजीत डफळे,सचिन मनवर, वेदांत बकाले,किशोर चव्हाण,कैलास भोयर,आदी मान्यवरांचा समावेश होता.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.पंढरी पाठे तर आभार दक्षता डंभारे यांनी मानले.

प्रतिनिधी कलीम खान यवतमाळ