MUMBAI | मुंबईतील कुख्यात गुंड आणि अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा खास हस्तक डी. के. राव याला पुन्हा एकदा अटक करण्यात आली आहे. एका हॉटेल व्यावसायिकाला खंडणीसाठी धमकावल्याप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने ही कारवाई केली. राव याच्यासह त्याच्या सहा साथीदारांनाही अटक करण्यात आली आहे.