कळमनुरी : जन्म मृत्युचे प्रकरणे दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर यांच्याकड़े चालविल्या जात होतेय मागील काळात शासन राज्यपत्रक दिनांक ११ ऑगस्ट २३ व गृह विभागा कडून अधिसूचना १० सप्टेबर २३ नुसार संबंधित प्रकरण उपविभागीय त्यानंतर तहसील कार्यालयात मध्ये वर्ग करण्यात आली होती ज्यात संबंधित कामकाज दैनंदिन सुरु असतांना २१ जानेवारी २४ मंगळवारी आलेल्या शासनादेश मध्ये जन्म मृत्यु प्रकरणेमध्ये स्थगिती दिली ज्यामुळे दाखल असलेल्या प्रकरणे प्रलंबित राहिले त्यामुळे नागरिकांची गैरसोई होणार असुन यात नागरिकांना न्यायापासुन वंचित राहावे लागणार आहे यामुळे संबंधित जन्म मृत्युचे प्रकरणे मा दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर यांच्याकड़े हस्तातंरित वर्ग करण्यात यावे त्यानिमित्त जन्म मृत्यु प्रकरणामध्ये खऱ्या लोकांना न्याय मिळू शकते त्यादृष्टि भावनाने कळमनुरी सर्व वकिलांकडून केंद्रीय कायदा व न्यायमंत्र्यांकड़े निवेदना द्वारे विनंती अँड मनोज देशमुख. अँड व्ही टी माखणे. अँड तातेराव देशमुख अँड एल सिरसाट अँड डि पी जाधव अँड सुरेश गरड अँड अविनाश काळे अँड विलास खंदारे. अँड प्रभाकर मोरे.अँड शकील शेख. अँड प्रदीप तड़स आदीने केली आहे..