येरमाळा प्रतिनीधी (सुधीर लोमटे ) –

एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत येरमाळा बीट अंतर्गत दि.६ रोजी येथील आनंदधाम सभागृहामध्ये पालक,आनंद मेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्यासाठी येरमाळ्यासह पंचक्रोशीतील पालकांनी सहभाग घेतला .
एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत बालकांना सुदृढ बनविण्याच्या दृष्टिकोनातून बालकांना तसेच कुटुंब व समुदायाचे सक्षमीकरण व शून्य ते तीन वर्षे बालकाच्या सर्वांगीण विकासासाठी टप्पा २ अंतर्गत बाळाच्या जीवनातील २ वर्षाचा होईपर्यंत त्याच्या मेंदूच्या विकासासाठी मातेला आवश्यक आहार द्यावा तो समतोल असावा . बाळाच्या जन्मापासून तो दोन वर्ष पूर्ण होईपर्यंत बाळास कोणता आहार द्यावा, मनोरंजनाची साधने कोणती असावीत त्या संदर्भात आईला ( मातांना )मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमासाठी बालविकास प्रकल्प अधिकारी ताई बोराडे, संगीता सावंत, अनिता थोरात,सरपंच प्रिया बारकुल,अनुपमा बोरफलकर, येडाई व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक डॉ श्री संदीप तांबारे, डॉ पल्लवी तांबारे यांच्यासह येरमाळा बीट आशा कार्यकर्ती अंगणवाडी सेविका, मदतनीस, ग्रामस्थ, महिला पालक,पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोरख बारकुल यांनी केले तर आभार पवार मॅडम यांनी मांनले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *