फुलचंद भगत
वाशिम:-सामाजिक कार्य आणी आरोग्य सेवेची दखल घेवुन वैदर्भीय चारीटेबल ट्रष्ट व्दारा आयोजीत एका समारंभामध्ये मंगरुळपीर येथील श्रीमती कल्यना कृष्णराव सावळे यांना ‘महाराष्ट भुषण’ पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह,प्रशस्तीपञक देवुन सन्मानित करण्यात आले आहे.
वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड येथील वैदर्भीय चारिटेबल ट्रष्ट व्दारा राज्यस्तरीय महाराष्ट भुषण पुरस्कार सोहळ्याचे आयोजन दि.२३ फेब्रुवारी रोजी करण्यात आले होते.या सोहळ्याला आमदार सईताई डहाके,आमदार हरिष पिंपळे,गीरीधारीलाल सारडा, संस्थेच्या अध्यक्षा पुनम पवार,सचीव एकनाथ पवार,पञकार निलेश सोमानी,संजय कडोळे आदी मान्यवरांच्या हस्ते मंगरुळपीर येथील माजी आरोग्य विस्तार अधिकारी तथा राज्य प्रशिक्षक आरोग्य विभाग यांना सामाजीक कार्याबद्दल तसेच आरोग्य सेवेबद्दल सन्मानचिन्ह,प्रशस्तीपञक देवुन ‘महाराष्ट भुषण’पुरस्कार देवुन गौरव करण्यात आला.या गौरवाबद्दल त्यांचे सर्वस्तरातुन कौतुक होत असुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
