येरमाळा प्रतिनीधी (सुधीर लोमटे) –
ता.२६ येथील नागझरी महादेव मंदिरात शिवरात्री निमित्त भाविकांनी गर्दी केली होती.सध्या प्रयागराज महाकुंभमेळ्याचे सोशल मीडियावरील व्हायरल रिल्समुळे
या वर्षी दरवर्षीच्या तुलनेत नागझरी महादेव मंदिरात शिवरात्री निमित्त भाविकांनी गर्दी केल्याने दर्शनासाठी, भाविक – महिलांभाविकांच्या रांगा लागल्या होत्या.
येरमाळा ते बार्शी रोडवर बालाघाटाच्या रांगेत नागझरी नावाने पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेले महादेवाचे मंदिर आहे . नवसाला पावनारा महादेव म्हणुन हे मंदिर प्रसिद्ध आहे. बालाघाटाच्या नयनरम्य परिसरात हे महादेव मंदिर असुन येरमाळा येथील गंगाधर गोरे यांचे वडील महादेव गोरे हे या भागात जनावरे चारण्यासाठी जात असत . जनावरे चरायला लागली की ते नेहमी एका जागेवर महादेवाचा नाम जप करत असत . त्यांना एकेदिवशी ते जिथे बसतात तिथे जमिनीत महादेवाचे शिवलिंग असल्याचा साक्षात्कार झाला म्हणुन या ठिकाणी उत्खनन केले असता दोन शिवलिंग निघाले,बरीच वर्षे महादेव गोरे यांनी पत्र्याचा निवारा करुन शिवलिंगाची प्रतिष्ठापना करुन सेवा केली महादेव गोरे यांचा मुलगा गंगाधर गोरे यांनी सत्तर,ऐंशी वर्षा पूर्वी चुना वाळू ने दगडी मंदिर बांधून नागझरी महादेव मंदिराचा जीर्णोद्धार केला. त्यांच्या पाश्च्यात नारायण गोरे यांनी मंदिराची सेवा केली नारायण गोरे यांच्या पाश्च्यात गणेश गोरे,महेश गोरे मंदिराची सेवा करतात.
आज शिवरात्री निमित्त दिवसभर महादेवाच्या दर्शनासाठी विक्रमी गर्दी केल्याने दिवसभर भाविकांना दर्शन घेण्यासाठी रांगेतुन दर्शन घेण्यासाठी दोन तास वेळ लागला.यंदा प्रयागराज येथील सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या रिल्स मुळे यंदाच्या शिवरात्रीला नागझरी महादेव मंदिरात गर्दी झाल्याचे भाविक बोलत होते,पंचक्रोशीतील मलकापूर, उपळाई,सापनाई,पानगाव,उमरा,रत्नापूर,तेरखेडा, दुधाळवाडी,बांगरवाडी येथुन महिला भाविकांनी पायी चालत येऊन दर्शन घेतले.