हॉटेल, सेतू केंद्र, नाश्ता सेंटर चालक अडचणीत : ओटीपी असेल तरच मिळणार गॅस सिलिंडर

अहिल्यानगर
आखातामधील युद्धाचे
परिणाम गॅस सिलिंडरच्या भरतीवर झाले आहेत. गॅस सिलिंडरचा पुरवठा करण्यात गॅस एजन्सी कंपनी कमी पडत आहे. यामुळे बुकिंग केल्यावर चार ते पाच दिवसांनंतर मिळणारे सिलिंडर आता चक्क ३० दिवसांनंतर मिळणार आहे. यातून सिलिंडर ग्राहकांमध्ये दहशत पसरली आहे. यातून हॉटेल चालक, सेतू केंद्र चालक, नाश्ता सेंटर चालक आणि घरगुती ग्राहक चांगलेच अडचणीत आले आहेत.

जिल्ह्यात हजारोंच्या घरात सिलिंडरधारक ग्राहक आहेत. या ग्राह‌कांना दरमहा सिलिंडरची गरज आहे. यातून जिल्ह्यातील सर्वच एजन्सी धारकांकडे दररोज एक ते दोन वाहनांची आयात केली जाते. मात्र, आता आखातामधील युद्धानंतर गॅसचा पुरवठाच प्रभावित झाला आहे. गॅस सिलिंडरच्या निर्मितीला याचा मोठा फटका बसला असल्यामुळे
एचपी, इंडेन आणि भारत गॅस कंपनीने गॅसचा पुरवठा कमी केला आहे. यातून ग्राहकांची अडचण वाढली आहे. ज्या गॅस एजन्सीकडे पूर्वी चार दिवसांआड सिलिंडर उपलब्ध होत होते. त्या एजन्सी चालकांनी चक्क ३० दिवसांनंतरच गॅसच्या पुरवठ्याचे बुकिंग करण्याचे आदेश काढले आहेत. यामुळे ग्राहकांना पुढील सिलेंडरसाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

हजारो ग्राहकांना दरमहा सिलिंडरची गरज आहे. यातून जिल्ह्यातील सर्वच एजन्सीकडे दररोज दोन वाहनांची आयात केली जाते. मग ताळमेळ कसा बसणार हा प्रश्न आहे

ईकेवायसी नाही तर मग येणार अडचण

गॅस ग्राहकांनी बुकिंग केल्यावर त्याचा ओटीपी मिळतो. हा ओटीपी पूर्वी न सांगताही सिलिंडर दिले जात होते. मात्र, आता ओटीपी क्रमांक देणाऱ्या ग्राहकांनाच सिलिंडर देण्याचे फर्मान आहे.

यामुळे ज्या ग्राहकांची ईकेवायसी नाही, अशा ग्राहकांच्या सिलिंडरकरिताच्या अडचणी वाढणार आहेत. सध्या सिलिंडर टंचाई नाही. पण

ग्रामीण भागात सिलिंडरच पोहोचलेच नाहीत

गत १५ दिवसांपासून ग्रामीण भागात सिलिंडर नसल्याच्या तक्रारी आहेत. या ठिकाणी गॅस सिलिंडरच्या गाड्याच
पोहोचल्या नाहीत. एजन्सी चालकांच्या सब एजन्सी ग्रामीण भागात आहे. मुख्य एजन्सीमध्येच गॅसची अडचण असल्याने सब एजन्सीचा पुरवठा थांबला आहे.

शिवभोजनही येणार अडचणीत

शिवभोजन केंद्र चालकांच्याही गॅसमुळे अडचणी वाढल्या आहेत. दररोज स्वयंपाकासाठीचा गॅस न मिळाल्यास १० रुपयांत भोजन द्यायचे कसे ? असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे. जिल्ह्यात सध्या सर्व केंद्रावरुन सुमारे दोन तीन हजारवर गरजू नागरिकांना भोजन मिळते. गॅसअभावी केंद्रापुढे अडचणी निर्माण झाल्यास लाभार्थ्यांच्या रोजी-रोटीचा प्रश्न निर्माण होणार आहे.

हॉटेल चालक म्हणतात, कोळशाच्या शेगडीवर स्वयंपाक

हॉटेलमध्ये चपातीऐवजी मैद्याच्या तंदुरी आणि भाजी, भात या वस्तू कोळशाच्या शेगडीवर करण्याचे काम सुरू झाले आहे. पुढील काळात तुटवडा वाढला तर एक दिवस बंद पाळावा लागेल, अशी स्थिती असल्याचे एका व्यावसायिकाने सांगितले आहे

नंदु परदेशी
जिल्हा प्रतिनिधी अहिल्यानगर
मो नं 9765886124

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *