६ लाख १७ हजार ७२५ रुपयांचा मुद्देमाल जप्त
वारे बंधूंना अटक
जामखेड तालुक्यातील
बांधखडक गावाच्या शिवारात शासना कडून लागवडीस प्रतिबंध असलेल्या अफु या अंमली पदार्थ अंशाच्या झाडाची लागवड केल्याप्रकरणी सुधाकर एकनाथ वारे व मारुती विश्वनाथ वारे यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांच्या शेतातील ६ लाख १७हजार ७२५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी अंमली पदार्थ लागवड व विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी दिलेल्या आदेशानुसार खर्डा पोलीस स्टेशनचे सपोनि उज्वलसिंग राजपूत यांनी या कामी एक पथक तयार केले आहे.
हेच पथक याबाबत माहिती घेत असताना सपोनि राजपुत यांना गुप्त बातमीदारामार्फत बांधखडक शिवारात सुधाकर एकनाथ वारे व मारुती विश्वनाथ वारे यांनी त्यांचे शेतात अफुच्या झाडांची लागवड केली असुन ते त्याचे संवर्धन व जतन करत त्याचा छुपा व्यापार करत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी प्रविणचंद्र लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तात्काळ बांधखडक शिवारातील संबंधित शेतात खात्री केली व सुधाकर वारे व मारुती वारे यांना ताब्यात घेतले. राजपुत यांनी त्यांच्याकडे असणाऱ्या या शेतातील
पिकाबाबत चौकशी केली असता सदरचे गवत हे अफू असून ते साधारण तीन ते चार महिन्यापूवी आम्ही लावलेले आहे. त्यास आम्ही खत पाणी घालुन त्याची जोपासना करत असल्याचे त्यांनी सांगितल्याने. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून २२, ५६१ किलो अफुची झाडे ज्याची बाजारभावा प्रमाणे अंदाजे किंमत एकुण ६ लाख १७ हजार ७२५ रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. याबाबत खर्डा पोलीस स्टेशनला संबंधीतावर अंबली पदार्थ संवर्धन ॲक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे अप्पर पोलीस अधीक्षक वैभकलुबर्गे, यांच्या मार्गदशनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी प्रविणचंद्र लोखंडे, खर्डा पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्वलसिंह राजपुत पोहेकॉ. संभाजी शेंडे, संदिप धामणे, गोकुळ इंगवले, प्रविण थोरात, विष्णु आवारे, धनराज बिराजदार, शाम चखाले, बालाजी खाडे, अशोक बडे, शशीका म्हस्के, मुन्ना शेख, चालक पोकाँ शकिल बेग,यांनी केली.
नंदु परदेशी
जिल्हा प्रतिनिधी अहिल्यानगर
मो नं 9765886124
