♦️खारेकर्जुने (ता. अहिल्यानगर) येथील एका तरुणाने पत्नी व सासूच्या जाचाला कंटाळून शनिवारी (ता. २२) आत्महत्या केली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी मयताची पत्नी व सासू विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
♦️सागर सुधाकर निमसे (वय ३४, रा. खारेकर्जुने, ता. अहिल्यानगर) याने खारे कर्जुने ते हिंगणगाव दरम्यान एका शेतात आत्महत्या केली. या प्रकरणी सागरचे वडील सुधाकर तुकाराम निमसे यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. या फिर्यादीत म्हटले आहे की, सागरला त्याची पत्नी व सासू वेगळे राहण्यासाठी दबाव आणत होते. यातून त्याने आत्महत्या केली. दाखल फिर्याद नुसार पोलिसांनी सागरची पत्नी योगिता निमसे व सासू कमल गोरख बोठे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.