पवार कुटुंबियांचा समाज उपयोगी स्तुत्य उपक्रम..
उद्या दिनांक १४ मार्च २०२६ रोज शनिवारी पवार कुटुंबियांच्या वतीने सर्व धर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून, या सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्यात नऊ जोडपी विवाहबद्ध होणार असल्याची माहिती ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. संजय पवार यांनी दिली आहे. विश्वातील मानव कल्याणासाठी ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले, अशा थोर महामानवांच्या उदात्त विचारधारेचे स्मरण करत आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून पवार कुटुंबीय हे गेली २५ वर्षापासून धार्मिक व सामाजिक असे विविध उपक्रम अविरतपणे राबवीत आहे, त्याचाच एक भाग म्हणून "सर्व धर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याच्या" माध्यमातून समाजात ऐक्य, धर्मनिरपेक्षता आणि बचतीतेतून प्रगतीचा संदेश देण्याच्या उद्देशाने सर्व धर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन उद्या *दि.१४ मार्च २०२६ रोज शनिवारी सकाळी ११:०० वाजता कै. शिवरामजी पवार मंगल कार्यालय घोडज रोड कंधार* येथे करण्यात आले आहे. ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक सचिव कै. शिवरामजी पवार यांच्या स्मृतीनिमित्त हा सर्व धर्मीय सामूहिक विवाह सोहळा या समाज उपयोगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या सर्व धर्मीय सामूहिक विवाह सोहळ्यासाठी नऊ जोडप्यांनी आपली विवाह नोंदणी केली असून, या विवाह सोहळ्यासाठी पवार कुटुंब यांच्या वतीने वधूस मनी मंगळसूत्र, कार्यालय, निवास व भोजनाची सुविधा मोफत केली आहे.
पवार कुटुंबीय आयोजित सर्व धर्मीय सामूहिक विवाह सोहळ्यातील नववधूवरांना शुभ आशीर्वाद देण्यासाठी व विवाह सोहळ्याची शोभा वाढविण्यासाठी वधू-वरांचे नातेवाईक, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन डॉ. विजय शिवरामजी पवार, डॉ. संजय शिवरामजी पवार, डॉ. राजेंद्र शिवरामजी पवार, सौ. जयश्री शरमन चव्हाण यांनी केले आहे.
