डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, राजा माने तसेच संघटनेचे महाराष्ट्र राज्य समन्वयक, इक्बाल शेख यांनी दिनांक 26 फेब्रुवारीला नागपूर येथील अर्बन हर्मिटेज हॉटेलमध्ये नियुक्तीपत्र देऊन सत्कार केला. यावेळी राज्य कार्यकारणी सदस्य, रजत दायमा, धाराशिव जिल्हाध्यक्ष, आयुब शेख तसेच संभाजीनगर जिल्हाध्यक्ष, रमेश नेटके उपस्थित होते .

डिजिटल पत्रकारांच्या देशातील पहिल्या संघटनेच्या सावंतवाडी येथे 06 एप्रिल 2025 रोजी होऊ घातलेल्या तिसऱ्या ऐतिहासिक महा अधिवेशनाच्या संदर्भात नागपूर, चंद्रपूर तसेच गडचिरोली साठी हा दौरा नियोजित होता. या दौऱ्या दरम्यान विविध ठिकाणी झालेल्या या बैठकीत संस्थापक अध्यक्ष, राजा माने यांनी राज्य कार्यकारणी सदस्यपदी, अहिल्यानगरचे रजत दायमा, विदर्भ विभाग समन्वयक पदी, सतीश आकुलवार, नागपूर शहर, अध्यक्षपदी, अनिल बालपांडे, चंद्रपूर जिल्हा अध्यक्षपदी, मुन्ना तावाडे , गडचिरोली जिल्हाध्यक्षपदी, बाबू कुरेशी तर सचिव पदी, सुनील धुर्वे यांच्या या विशेष नियुक्त्या करून नियुक्ती पत्रासह यांचा सत्कार सुद्धा करण्यात आला.
यावेळी संस्थापक अध्यक्ष, राजा माने यांनी संघटनेच्या स्थापनेचे उद्दिष्ट तसेच पुढील वाटचाली बद्दलचे नियोजन बद्दल सविस्तर माहिती दिली. राज्यभरात आतापर्यंत 18000 पत्रकार संघटनेशी जोडले असून पुढेही हा टप्पा निश्चितच वाढणारा आहे. डिजिटल मीडिया पत्रकारांच्या कल्याणार्थ बरेच काही निर्णय घेतल्या जातील तेव्हा आपण सर्वांनी या संघटनेशी जुळून अधिवेशनात सहभागी व्हावे ,असे आवाहन त्यांनी यावेळी केले .