येरमाळा दि ०२-
येरमाळा येथील डॉक्टर आणि केमिस्ट असोशिएशन व शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने संयुक्तीक आरोग्य शिबीर पार पडले. गणेशोत्सव, महापुरुष जयंती वर्गणी देण्या ऐवजी आरोग्य शिबीर घेण्याचे डॉक्टर, केमीस्ट असोशीएशनने निर्णय जाहीर केला होता.
त्या अनुषंगाने शिवजयंती निमित्त शिवजयंती महोत्सव समितीच्या आयोजनाने रविवारी (ता. ०२ ) येथील विठ्ठल रुक्मीणी मंदिरात आरोग्य तपासणी, उपचार शिबीर पार पडले. या शिबिरात सर्व डॉक्टरांकडून रुग्णांच्या तपासणी तर केमिस्ट कडुन मोफत औषधे वाटप करण्यात आले.
महिलांना शारिरीक स्वास्थ्यासाठीच मार्गदर्शन करण्यासाठी बार्शी येथील स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. गौरी कैवल्य गायकवाड यांची विशेष उपस्थिती होती तर बार्शी येथीलच नाक, कान, घसा तज्ज डॉ. इर्शाद तांबोळी हे उपस्थित होते .डॉ. गौरी कैवल्य गायकवाड यांनी महिलांना व्यायामाची गरज असुन त्याचे महत्व पटवून दिले. सतत काम करून कामाच्या शेवटी थकवा येतो पण व्यायाम करून व्यायामानंतर उत्साह येतो त्यासाठी व्यायाम महत्वाचा आहे . आहार कसा आणि किती असावा या विषयीचे मार्गदर्शन केले व महिलांनी स्वतः साठी वेळ द्यावा असा संदेश दिला .
या आरोग्य शिबीरामध्ये जवळपास १५० महिलांची उपस्थिती होती व इतर ९० रुग्णांची तपासणी करण्यात आली .
या शिबिराच्या उदघाटन प्रसंगी पंचायत समितीचे माजी सभापती विकास बारकुल, संरपंच प्रिया बारकुल, प्रविण बारकुल, डॉ. राजकुमार घुगे,राहुल पाटील, बालाजी रमेश बारकुल, कुंदन कांबळे, अमोल बारकुल सर, रामेश्वर चौधरी, अविनाश बारकुल, महेश बारकुल, नदीम मुलाणी यांची उपस्थिती होती .
हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉक्टर, केमिस्ट असोसिएशनचे डॉ राजकुमार घुगे, डॉ. सचिन पवार, डॉ. संदीप तांबारे, डॉ. अमित मुंडे, डॉ. सचिन बांगर, डॉ. पल्लवी तांबारे, डॉ. दैवशाला भगत, डॉ. स्मिता बारसकर, डॉ. बांगर मॅडम, व केमिस्ट असोशियनचे गोविंद मुंडे, कश्मीर शेख, जाफर शेख, रघुनाथ बारकुल, किरण पौळ, सुरज वणवे, सौरभ बैरागी, चैतन्य चाळक, नयन मुंडे, अजेंद्र शामकुळे, आण्णासाहेब माढेकर, वैभव बारसकर यांनी रुग्णांना मोफत तपासुन औषधोपचार दिले . कार्यक्रमाच्या शेवटी महिला प्रतिनिधी म्हणून उषा अमोल बारकुल यांनी आभार मानले .