(उमरगा प्रतिनिधी)
१ मार्च २०२५ रोजी मातंग समाज महा अधिवेशना संदर्भात व लहुजी शक्ती सेना उमरगा-लोहारा तालुक्यातील कार्यकर्त्यांचे नवीन पद नियुक्त्या अनुषंगाने दि २५ रोजी शासकीय शहरातील विश्रामगृहात उमरगा-लोहारा तालुका लहुजी शक्ती सेना कार्यकारणीची बैठक पार पडली.
बैठकीत महिला आघाडी प्रदेशाध्यक्षा सौ. मायाताई लोंढे ,मराठवाडा उपाध्यक्ष- राजाभाऊ शिंदे,महिला आघाडी,जिल्हाध्यक्षा सारिकाताई कांबळे,जिल्हा संघटक भाग्यश्रीताई सूर्यवंशी ,उमरगा तालुका अध्यक्ष विजय भाऊ तोरडकर,महिला तालुकाध्यक्षा अलकाताई कांबळे,तालुका कार्याध्यक्षा – गिण्यानबाई कांबळे व उमरगा लोहारा तालुक्यातील समाज बांधव उपस्थित होते.
उमरगा लोहारा तालुक्यातील पद नियुक्ती मान्यवरांच्या उपस्थितीत करून नियुक्ती पत्र देण्यात आले. युवक तालुका अध्यक्षपदी विशाल अशोक गायकवाड, उपाध्यक्षपदी गजानन लक्ष्मण एडके, लोहारा तालुका संपर्कप्रमुखपदी अर्जुन इराप्पा थोरात, उमरगा शहराध्यक्षपदी विनोद हरिचंद्र एडके, सचिव पदी मंगेश अशोक सुरवसे, विद्यार्थी महिला आघाडी तालुका अध्यक्षपदी सुप्रिया वामन शिंदे, उपाध्यक्ष निकिता विलास चिमुकले, सचिव जोगेश्वरी किरण शिंदे इत्यादींच्या नवीन नियुक्ती करण्यात आल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केशव भाऊ सरवदे यांनी केले. कार्यक्रमाचे संयोजक लहुजी शक्ती सेना उमरगा तालुका अध्यक्ष विजय भाऊ तोरडकर यांनी केले होते.
