येरमाळा प्रतिनीधी (सुधीर लोमटे) –
गौर ता.कळंब येथे ग्रामपंचायत कार्यालय व डॉ.मधुकर देशमुख यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . या प्रसंगी कळंबच्या नायब तहसिलदार (पुरवठा विभाग ) शिल्पा माळवे यांनी मुलींच्या उज्वल भविष्यासाठी पालकांनी मुलींना वैचारिक स्वातंत्र्य द्यावे म्हणजे त्याचा फायदा त्यांच्या भावी आयुष्यामध्ये होईल व आपल्या कार्याचा प्रभाव पाडू शकतील असे मनोगत व्यक्त केले. या निमित्ताने रांगोळी स्पर्धा व संगित खुर्ची, सदृढ बालक स्पर्धा तसेच आदर्श अंगणवाडी सेविका, मदतनीस यांचा सत्कार करण्यात आला.
या स्पर्धेमध्ये गुणानुक्रमे रांगोळीत प्रथम स्वाती रोहन देशमुख द्वितीय क्रमांक प्रियांका विनोद लंगडे तृतीय क्रमांक अंकिता बालाजी बंडगर तसेच संगित खुर्ची स्पर्धेत प्रथम क्रमांक साधना ज्ञानेश्वर सुतार, द्वितीय क्रमांक सत्यशिला रवींद्र चौधरी तृतीय क्रमाक छाया रमेश देशमुख तसेच सदृढ बालकामध्ये राजनंदिनी गजेंद्र देशमुख, प्रांजली श्रीकांत माळी, सिद्धी दत्तात्रय अवधुत, आरोही रविंद्र अरुणे यांचा सत्कार करून खाऊचे डब्बे वाटप करण्यात आले .
डॉक्टर मधुकर देशमुख यांच्या मातोश्री कै. राजाबाई यशवंतराव देशमुख यांच्या स्मरणार्थ गावातील वयोवृद्ध महिलांना आधार काठी वाटप करण्यात आल्या .
सरपंच सुषमा धनंजय देशमुख, उपसरपंच रामेश्वरी निवृत्ती लंगडे,डॉ. मधुकर देशमुख या तिघांच्या आर्थिक सहकार्याने आयोजन करण्यात आले होते. यावेळी जयदेवी कांबळे, पुरवठा निरिक्षक कळंब माजी मुख्याध्यापक सुलतान सय्यद, रमेश देशमुख,उषा तौर,मनिषा लंगडे, सुलभा नलावडे ,अनिता माळी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपसरपंच रामश्वेरी लंगडे यांनी केले तर सुत्रसंचलन,अंकिता लंगडे यांनी केले.
या कार्यक्रमासाठी आबासाहेब देशमुख, धनंजय देशमुख,अंजली देशमुख,उज्वला देशमुख,साधना पवार, शितल तौर,नंदू बाई माने,वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गीतांजली गायकवाड, जंगम सिस्टर अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्त्या, ग्रामपंचायत चे सर्व कर्मचारी उपस्थित होते या महिला दिनाच्या कार्यक्रमामध्ये महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली . या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सपकाळे मॅडम यांनी केले