येरमाळा प्रतिनीधी (सुधीर लोमटे ) –
कै. रावसाहेब थोरबोले स्मृती वाचनालय व नरसिंह मित्र मंडळ येरमाळा यांच्या वतीने आज बाजार चौक येरमाळा येथे जागतिक महिला दिन उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी येरमाळ्यातील प्रथम नागरिक सरपंच सौ प्रिया विशाल बारकुल, प्रमुख अतिथी म्हणून आदर्श माता वैशाली शिरसाट सौ उषा अमोल बारकुल मॅडम सौ अरुणा बारकुल सौ वर्षा बारकुल सौ छबुबाई बारकुल सौ सुषमा बारकुल सौ स्वाती बारकुल सौ आशा मोरे सौ भारती बारकुल सौ मंगल मोरे सौ अर्चना आगलावे उपस्थित होते यावेळी सूत्रसंचालन कु.रोशनी बारकुल हिने केले तर आभार कु.मयुरी बारकुल यांनी मानले यावेळी यावेळी आदर्श माता सौ वैशाली शिरसाठ यांनी उपस्थित महिलांना संदेश दिला स्वावलंबी हा सक्षम बना व आपले ध्येयपूर्तीसाठी सतत प्रयत्नशील रहा तसेच वर्षांनी बारकुल यांनी आपला आरोग्य आपलं कुटुंब व आपले हक्क याविषयी सर्वांना मार्गदर्शन केले तसेच उषा बारकुल मॅडम यांनी स्त्री सक्षमीकरण या विषयावरती सर्व उपस्थित महिला यांना मार्गदर्शन केले व जागतिक महिला दिन का कशामुळे साजरा करायचा व त्याचे महत्त्व उपस्थित त्यांना पटवून सांगितलं तसेच येरमाळ्यातील सरपंच सौ प्रिया बारकुल यांनी सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देऊन आपली कार्य कर्तव्य सक्षमपणे पार पाडा नारी ही अबला नसून ती सबला आहे असा संदेश दिला .