येरमाळा प्रतिनिधी (सुधीर लोमटे) –
कळंब तालुक्यातील येरमाळा येथे दिनांक २० मार्च पासुन जगद्गुरु तुकोबाराय त्रिशतकोत्तर अमृत महोत्सव सदेह वैकुंठगमन सोहळा व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे . सप्ताहाची सुरुवात दिनांक २० रोजी सकाळी कलश पुजन, विना पुजन, टाळ व मृदंग पुजन करून होणार आहे .
येरमाळा येथील भजनी मंडळाच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या या सप्ताहाचे ३६ वे वर्ष आहे .
या सप्ताहामध्ये दररोज पहाटे ४ ते ६ काकडा भजन, ६ ते ७ विष्णुसहस्त्रनाम , ८ ते ११ गाथा भजन, दुपारी ४ ते ६ भावार्थ रामायण, सायंकाळी ६ ते ७ हरिपाठ,रात्री ८ .३० ते १०.३० हरिकिर्तन तर रात्री ११ ते १ हरिजागर होणार आहे . दररोज रात्रीच्या किर्तनामध्ये अनुक्रमे दिनांक २० रोजी ह.भ.प. भजन गंधर्व पंढरीनाथ महाराज आरू आळंदी, दिनांक २१ रोजी ह .भ. प . अनिल महाराज पाटील बाभळगाव , दिनांक २२ ह.भ.प. मुकुंद महाराज पाटेकर रत्नागिरीकर, दिनांक २३ रोजी ह.भ.प. विलास महाराज पिंगळे पाथर्डीकर, दिनांक २४ रोजी ह.भ.प. परमेश्वर महाराज उगले नाशिक, दिनांक २५ रोजी ह. भ.प.ज्ञानेश्वर माऊली महाराज पठाडे कर्जत, दिनांक २६ रोजी ह.भ.प. शांतीगिरी महाराज ढगे चिंचपुर यांचे किर्तन होणार असुन गुरुवार २७ रोजी सकाळी ९ ते ११ ह.भ.प. प्रकाश बोधले महाराज डिकसळ यांच्या काल्याच्या किर्तनाने सप्ताहाची सांगता होणार आहे व त्यानंतर येरमाळा येथील गुरव समाजाच्या वतीने महाप्रसादाचे वाटप होईल.
कळंब आणि धाराशिव तालुक्यातील अनेक गावातील भजनी मंडळ या सप्ताहासाठी उपस्थित राहणार असुन सर्व भाविक भक्तांनी या सप्ताहासाठी व महाप्रसादासाठी उपस्थित राहुन कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन येरमाळा येथील भजनी मंडळाच्या सर्व सदस्यांनी केले आहे .