DHARASHIV | मराठी नविन वर्षाच्या निमीत्ताने धाराशिव जिल्हयातील जिल्हा परिषद व नगर पालिकांच्या शाळेत इयत्ता पहिलीसह पुढील सर्व वर्गात प्रवेश पात्र विद्यार्थ्यांचे प्रवेश व्हावेत एकही विद्यार्थी शाळाबाह्य राहू नये यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने गुढी पाडवा, प्रवेश वाढवा हा अभिनव उपक्रम हाती घेण्यात आला आहे .
या उपक्रमाला प्रतिसाद देत दि. १७ मार्च रोजी कळंब तालुक्यातील शेलगाव दि.येथे प्रवेश दिंडीचे आयोजन करण्यात आले होते . या दिंडीच्या माध्यमातून पालकांना शिक्षणाचे महत्व पटवून देण्यात आले . तसेच दि .१७ मार्च ते २० मार्च पर्यंत घरोघरी जाऊन सन २०२५ – २६ साठी प्रवेश पात्र विद्यार्थ्यांचे प्रवेश घेतले जातील . तसेच इतर ही ६ ते १४ वयोगटातील विद्यार्थ्यांना आपल्या शाळेत प्रवेश दिले जातील. दिनांक २१ मार्च पासून आपल्या शाळेत इयत्ता पाहिलीचा वर्ग सुरु करून १०० टक्के विद्यार्थी वर्गात उपस्थित ठेवून,१ एप्रिल रोजी गावातील सर्व पालक, शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षण प्रेमी नागरिक यांना शाळेत बोलावून यांच्या उपस्थितीत आपल्या शाळेत प्रवेशित झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचा साखरेचे हार, पुष्पगुच्छ फेटा बांधून स्वागत सत्कार करण्यात येणार आहे . ३०एप्रिल पर्यंत इयत्ता १ ली चे वर्ग सुरु ठेवणार व त्याबरोबरच शिष्यवृत्ती व नवोदय जादा तास सुरु करणार आहेत. असा नियोजनबद्ध कार्यक्रम आखून शिवाय इतर वर्गातील प्रवेश वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी आवाहन करून लोकांना जागृत करण्यासाठी व जिल्हा परिषद शाळा पट निर्धारणास्तव बंद पडू नयेत या करिता प्रवेश वाढीसाठी प्रभात फेरीचे आयोजन करण्याचे आवाहन शिक्षक संघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष बाळकृष्ण तांबारे यांनी सूचित केले होते . त्याला प्रतिसाद देत शेलगाव दिवाणे येथे काढलेल्या फेरीला गावकऱ्यांनी उत्तम प्रतिसाद देत बहुतांशी प्रवेश निश्चित झाले आहेत. एखादया संघटनेने सामाजिक भावनेने अशा प्रकारचे काम करणे आणि सातत्याने विद्यार्थी हित लक्षात घेऊन दक्ष असणाऱ्या महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे मा. मैनाक घोष मुख्यकार्यकारी अधिकारी , तसेच मा. अशोक पाटील प्राथमिक शिक्षणाधिकारी व डायटचे प्राचार्य दयानंद जेटनुरे यांनी कौतुक केले आहे. आजच्या फेरीला शाळेचे मुख्याध्यापक रविंद्र शिनगारे, शिक्षक हणमंत पडवळ , भाऊसाहेब जगताप, ज्ञानेश्वर सुरवसे, सुधीर देशमुख तसेच ज्योती ऐडके, प्रशांत दिवाणे, शा.व्यवस्थापन समिती अध्यक्ष सतिश दिवाणे , गावकरी उपस्थित होते.

येरमाळा प्रतिनीधी (सुधीर लोमटे)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *