येरमाळा प्रतिनीधी (सुधीर लोमटे ) –
येरमाळा येथील विद्यानिकेतन प्री- प्रायमरी स्कूलमध्ये इयत्ता पहिलीसाठी प्रवेश वाढवा या संकल्पनेतुन प्रवेशोत्सव कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे अध्यक्ष सचिन पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून सतिष पाटील व प्रविण बारकुल हे उपस्थित होते .
संस्थेचे अध्यक्ष सचिन पाटील सर यांनी उपस्थित पालकांना मार्गदर्शन केले आणि आपल्या पाल्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी योग्य शाळेची निवड कशी करावी, याविषयी माहिती दिली. त्यांनी पालकांना विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेच्या उपक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
विद्यानिकेतन विद्यालयाने शैक्षणिक गुणवत्ता आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला आहे. तसेच, ही शाळा इयत्ता पहिलीपासूनच विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेत आहे, जेणेकरून विद्यार्थी लहान वयातच स्पर्धात्मक शिक्षण पद्धतीशी परिचित होतील आणि उज्ज्वल भविष्यासाठी सक्षम होतील असे मत सचीन पाटील यांनी बोलताना व्यक्त केले .
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सतीश पाटील सर, तुषार रुमणे, मनोज जाधवर, प्रवीण बारकुल, संदीप ढवळे, आश्विनी बारकुल, सुनीता बारकुल, वाघमारे सर आणि प्रशासकीय अधिकारी अनिल डोके सर आदी उपस्थित होते . त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून शाळेच्या शिक्षण प्रणालीबद्दल समाधान व्यक्त केले आणि पालकांना शाळेच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
तसेच, विद्यानिकेतन प्राथमिक व माध्यमिक विद्यालयातील शिक्षक टेकाळे सर यांनी विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन केले, ज्यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्व पटवुन दिले.
या शाळेत इयत्ता पहिलीसाठी जवळपास २०० विद्यार्थ्यांची नावनोंदणी झाली असून, उत्स्फूर्त प्रतिसादामुळे प्रवेशासाठी रांगा लागल्या आहेत. हा यशस्वी प्रतिसाद फक्त कृतीयुक्त शिक्षणपद्धती आणि विद्यार्थ्यांकडे दिल्या जाणाऱ्या विशेष लक्षामुळे मिळाला आहे.
पालक आणि विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. हा कार्यक्रम विद्यार्थी व पालकांसाठी प्रेरणादायी आणि माहितीपूर्ण ठरला.
तसेच, ‘माझी शाळा सुंदर शाळा’ या शासनाच्या उपक्रमांतर्गत विद्यानिकेतन शाळेला २ लाख रुपयांचे बक्षीस मिळाले आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पाळवदे मॅडम यांनी केले, तर प्रस्ताविक विद्यानिकेतन इंटरनॅशनल स्कूलच्या प्राचार्या प्रियंका पाटील यांनी सादर केले तर आभार वाघमारे मॅडम यांनी मानले .