LATUR | राज्य सरकारकडून मांडलेल्या अर्थसंकल्पात लाडक्या बहिणीसाठी नविन योजना आणली नाही निवडणुकीत २१०० रुपये देण्याचे ठोस आश्वासन महायुती सरकारने दीले होते याबाबत कुठलीच वाढीव तरतूद केली नाही तसेच राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे आश्वासन दिलेले होते यावर सुधा कुठलीच तरतूद केली नाही त्यामुळे शेतकरी, लाडक्या बहिणी यांना दिलेले सरकारकडून आश्वासन हे फोल ठरलेले आहे त्यामुळे कर्जमाफी शेतकरी व लाडक्या बहिणी साठी हा अर्थसंकल्प निराशा देणारा आहे अशी प्रतिक्रिया राज्याचे माजी अर्थराज्य मंत्री तथा सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांनी अर्थसंकल्पावर व्यक्त केली आहे.
राज्यात नवीन सरकार आल्यावर पहिलाच अर्थसंकल्प असल्याने राज्यांतील जनतेकडून अपेक्षा होत्या ज्या घोषणा निवडणुकीतील दिल्या होत्या वचन दीले होते त्याकडे पूर्णपणे सरकारचे दुर्लक्ष झालेले दिसून येत आहे. राज्यात सुशिक्षित बेकारी वाढलेली आहे त्यांच्यासाठी काहीच तरतूद केली नाही या अर्थसंकल्पात कुठलीच नवीन कामासाठी तरतूद नाही त्यामुळे हा अर्थसंकल्प कर्जमाफी शेतकरी व लाडक्या बहिणीसाठी निराशा
देणारा आहे असे मत माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी मांडले.
प्रतिनिधी मोमीन हारून
एन टीव्ही न्युज मराठी लातूर
9850347529