LATUR | लातूर अस्थिरोग तज्ज्ञ संघटना आणि मेडिकल असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर्स आणि ऑपरेशन थिएटर असिस्टंट्स यांच्यासाठी लातुरात आयोजित करण्यात आलेल्या एकदिवसीय कार्यशाळेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या कार्यशाळेस प्रमुख पाहुणे म्हणून लातूरचे पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, आरसीसी क्लासेसचे संचालक डॉ. शिवराज मोटेगावकर यांची उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाल्यानंतर महाराष्ट्र अस्थिरोग तज्ज्ञ संघटनेचे २०२५ -२६ चे अध्यक्ष डॉ. संपत डुंबरे पाटील, २०२६-२७ चे प्रेसिडेंट इलेक्ट डॉ. नारायण कर्णे , महाराष्ट्र ऑर्थो. असो.चे जिल्हाध्यक्ष तथा विभागीय उपाध्यक्ष डॉ. अशोक पोद्दार यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यशाळेत अस्थिरोगांच्या विविध व्याधी आणि संसर्गावर चर्चा करण्यात आली. या कार्यशाळेत डॉ. संपत डुंबरे पाटील, डॉ स्वप्नील कोठाडिया, डॉ शाहजात मिर्जा , डॉ महेश लाके, डॉ विजय चिंचोलकर, डॉ. द्वारकादास तापडिया यांसह मान्यवरांनी अतिशय उपयुक्त असे मार्गदर्शन केले.
यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी डॉक्टर आणि पोलीस प्रशासनामध्ये संवाद असणे अतिशय महत्वाचे आहे असे सांगितले. आपल्या परस्परांच्या ओळखी असाव्यात. आपल्या भागातील पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांचा आणि डॉक्टरांचा चांगला परिचय असल्यास त्याचा उभयतांसह समाजातील विविध घटकांनाही फायदा होऊ शकतो, असे त्यांनी सांगितले. लातुरातील सर्वच वैद्यकीय व्यावसायिकांचे कार्य प्रशंसनिय असल्याचे सांगून एक फोन करा, पोलीस आपल्या सेवेला हजर असतील, असा विश्वास व्यक्त केला. शिवराज मोटेगावकर यांनी यावेळी बोलताना लातूर शहरातील डॉक्टरांच्या आगळ्या वेगळ्या उपचाराच्या लातूर पॅटर्नबद्दल गौरवोदगार काढले. वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित नवनवीन तंत्रज्ञान लातुरात येत आहे. येथील डॉक्टरही सतत नवनवीन शिकण्याचा, त्याचा लाभ आपल्या रुग्णांना करून देण्याचा प्रयत्न सातत्याने करत असल्याचे दिसून येतात असे सांगून या सोहळ्यास आपल्याला आग्रहाने निमंत्रित केल्याबद्दल आभार व्यक्त केले. डॉ. डुंबरे पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना डॉ.अशोक पोद्दार व डॉ. संतोष माळी यांनी अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर्ससाठी आयोजित केलेल्या सीएमई बद्दल त्यांचे कौतुक केले. अशा प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन राज्यभरात होणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तर डॉ. नारायण कर्णे यांनी आपल्याला या कार्यशाळेस आग्रहपूर्वक निमंत्रित केल्याबद्दल समाधान व्यक्त करून सअशा कार्यशाळांचे आयोजनात लातूर नेहमीच पुढे असते असे सांगून नेहमीच पुढे रहा, महाराष्ट्र अस्थिरोग संघटना आपल्यासोबत आहे असे सांगितलॆ.
लातूर जिल्ह्यातील अस्थिशल्य चिकित्सक आणि ऑपरेशन थिएटर असिस्टंट्स यांच्यासाठी तीन तासांची कार्यशाळा घेण्यात आली. यामध्ये ओटी मध्ये कसे वागावे, स्क्रब कसे करावे, ट्रॉली कशी लावावी, ऑटोक्लेव्ह कसे करावे यासारख्या बाबींवर सविस्तर चर्चा करण्यात आली. या कार्यशाळेत शंभरहुन अधिक ओटी असिस्टंट्सनी उपस्थिती नोंदवली. या कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी डॉ. अशोक पोद्दार, डॉ. संतोष माळी, डॉ. द्वारकादास तापडिया, डॉ. विक्रम सूर्यवंशी, डॉ. तुषार पिंपळे यांनी परिश्रम घेतले.

प्रतिनिधी हारून मोमीन
9850347529 / 9822699888

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *