खुलताबाद : 8 मार्च 2025 रोजी जागतिक महिला दिनी तालुक्यातील कर्तबगार महिला पोलीस अंमलदार जयश्री बागुल, ग्रामीण रुग्णालय खुलता बाद येथील डॉक्टर जोशी, मुख्य रस्त्यावरून शेतात काम करणाऱ्या कष्टकरी मेहनती महिला लाडू बाई शिरसाट या सर्व कर्तबगार महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून बरोबरीने काम करण्याचा प्रयत्न करणाऱ्या कर्तबगार महीलांचा सत्कार राजाराम घुसळे (वंचित बहुजन आघाडी) वसंता शिरसाट गल्लेबोरगावकर ज्येष्ठ पत्रकार, पत्रकार इसाक कुरेशी मुनीर शाह. या सर्वांच्या हस्ते सन्मान करून त्यांच्या पुढील वाटचालीस महिला दिनी गुलाब पुष्प देऊन हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.

महिला दिन असल्यामुळे अनेक राष्ट्रमातानीं केलेले कार्य पिढ्यान पिढ्या आठवणीत राहतील असे कार्य करणाऱ्या माता जिजाऊ भोसले, माता सावित्रीबाई फुले, माता रमाई आंबेडकर, माता अहिल्याबाई होळकर, माता मदर तेरेसा, यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून अनेक महिला स्वबळावर किंवा घरच्या कुटुंबाचे सहकार्य घेऊन कार्य करत असतात अशा कर्तबगार महिला विविध कार्यक्षेत्रात आपल्या कर्तुत्वाचा झेंडा फडकविण्याचा प्रयत्न करत असतात. अशा महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी व करत असलेल्या कार्यास शुभेच्छा देण्यासाठी खुलताबाद पोलीस ठाण्याच्या महिला ठाणे अमलदार जयश्री बागुल, गृह रक्षक भारती पवार, काजल वाकळे, शालू विधाते, मंगल गडवे. तसेच ग्रामीण रुग्णालय खुलताबादचे आरोग्य अधिकारी डॉक्टर जोशी, अलकाबाई दाभाडे, संगीता पिसे, पूजा राठोड.
याचबरोबर मेहनती व कष्टकरी मुख्य रस्त्यावरून शेतातही काम करणाऱ्या महिला कडूबाई शिरसाट, उषाबाई शिरसाट, लिलाबाई शिरसाट, अलकाबाई जाधव, अनिता ढीवर, सुनिता डीवर आदी कर्तबगार महिलांचा शॉल गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला.

N.T.V.न्यूज साठी
मुनीर अब्बास शाह खूलताबाद