♦️शेवगाव तालुक्यातील लोकांना शेअर मार्केटमध्ये चांगला परतावा मिळवून देतो. या नावाखाली कोट्यावधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या साईनाथ कल्याण कवडे (रा. कुरूडगाव,ता. शेवगाव) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने काल (ता. १७) जेरबंद केले. साईनाथला अटक करावी, या मागणीसाठी शेवगावमध्ये अनेक आंदोलनेही झाली होती.
♦️साईनाथ कवडेने ऍसिटेक सोल्युशन ट्रेडींग कंपनीच्या नावाखाली एका व्यक्तीची एक कोटी ६१ लाख ४२ हजार ९०० रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा शेवगाव पोलीस ठाण्यात दाखल आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना माहिती मिळाली होती की, साईनाथ सुरत (राज्य गुजरात) येथे आहे. त्यानुसार पथकाने सुरत येथून आरोपीला ताब्यात घेतले. त्याने त्याची कार किशोर शिवाजी जाधव (रा. तिसगाव, ता. पाथर्डी) याला दिली होती. त्यानुसार पथकाने १५ लाख रुपये किमतीची कार हस्तगत केली आहे. पुढील तपासासाठी आरोपीला शेवगाव पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.