(अनिकेत उमरेडकर)
तेलकामठी:
कळमेश्वर तालुका अंतर्गत येणाऱ्या तेल कामठी येथील महावितरण कार्यालय उघडण्याची वेळ निश्चित नसल्यामुळे या कार्यालयाच्या कारभार लहरी व मर्जीनुसार चालत असल्याने स्थानिक नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.


कार्यालयात कार्यरत कर्मचारी हेडकॉटरला राहात नसतात किंवा कोणीही स्थायिक कर्मचारी येथे वास्तव्य करीत नसल्याने कार्यालय नेहमी 12 नंतर उघडतात तसेच दुपारी ४ चे दरम्यान नेहमी बंद होत असल्याने कार्यालय केव्हा उघडेल यासाठी ग्रामस्थांना सारख्या कार्यालयाकडे हेलपाट्या घालाव्या लागतात याचा ग्राहकांना सारखा त्रास होत असतो. एखाद्या प्रसंगी पावसाने वादळाने रात्रीच्या वेळेस विद्युत प्रवाह खंडित झाल्यास कोणीही जबाबदार कर्मचारी राहत नसल्याने गावकऱ्यांना रात्रभर विजेच्या प्रतीक्षेत तात्काळत राहावे लागते. तर शेतकऱ्यांना या समस्येचा सर्वात जास्त फटका बसत असून कार्यालयात तक्रार घेऊन गेल्यास ऑफिसची ठराविक वेळ नसल्याने भरतीच्या पावलाने घरी वापस यावे लागते, कार्यालयातील कार्यरत कर्मचाऱ्यावर अधिकाऱ्याचा वचक नसल्याने कर्मचारी मगरूर भाषेत बोलत असल्याने गावकऱ्यांनी विद्युत विभागावर तीव्र नाराजीचा सूर व्यक्त केला आहे.


उपरोक्त समस्या मार्गी लागण्यासाठी संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक लक्ष देऊन ही समस्या मार्गी लावावी अन्यथा ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
व वीज बिल विज बिल भरण्यास लेट झाले तर त्या ग्राहकांच्या घरी जाऊन ग्राहकांचा काही ऐकत नसून जबरदस्तीने लाईन काढण्यात येतात ग्राहक एक दिवसाचा वेळ मागतात तरी ते ऐकत नसल्यामुळे जबरदस्तीने लाईन काढतात व जवळील संबंधातील लोकांना वेळ दिला जातो असे का व या हेडकॉटरवर गंधगी वाढलेले गवत काडीकचरा खूप आहे यावर ते दुर्लक्ष करतात टोटल आठ कर्मचारी आहे.