(धाराशिव प्रतिनिधी) शहरातील गुंजोटी रोड व महामार्ग लागत असलेल्या राजधानी पेट्रोल पंप आणि बायपास कॉर्नर असे दिवसभर रस्त्यावरून साधारणत: 15 ते 16 वयोवर्षाची एक मुलगी मानसिक तणावातुन नवे कपडे परिधान केलेल्या अवस्थेत वावरत होती. कधी कधी तर ती महामार्गवरून अगदी रस्त्याच्या मधोमध जाऊ लागली,रस्त्यावरून जाणाऱ्या गाड्या तिच्या बाजूने जात होत्या पण त्या मुलीची विचारपूस कोणी करत न्हवते, लोक केवळ बघ्याची बघ्याची भूमिका बजावत होते. दि 16 मार्च रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास शहरातील व्यवसायीक फेरोज मुरशद यांनी या मुलीला रात्रीच्या अंधारात रस्त्याने एकटी जातं असलेली पहिली व त्या मुलीच्या मागे एक दुचाकी जात असल्याचे फेरोज यांना निदर्शनास आले. काहीतरी विपरीत घडतयं किंवा घडेल असं फेरोज यांना शंका आली आणि त्यांनी लागलीच एन टी व्ही चे पत्रकार सचिन बिद्री यांना कळविले. याबाबत संपूर्ण घटनाक्रम प्रत्यक्ष पाहून,जाणून घेऊन श्री बिद्री यांनी पोलिस निरीक्षक अश्विनी भोसले यांना सविस्तर माहिती दिली. दरम्यान या मुलीला जवळच्या एका चहाच्या हॉटेल वर आपुलकीने अधिक माहिती जाणून घेण्याचा आटोकाट प्रयत्न होऊ लागला.फेरोज मुर्शद, गुंजोटी गावचे जेष्ठ नागरिक दिलीप (भाऊजी) सगर,मुस्तफा कारभारी,आणि दुशान्त दंडगे आदींचे यां मुलीला विचारपूस करने सुरु होते.मुस्कान हीं अधिक घाबरलेली आणि खूप मोठ्या डिप्रेशन मध्ये असल्याचे यावेळी निदर्शनास आले. मुस्तफा कारभारी व फेरोज यांनी यां मुलीला चहा, बिस्कीट, वडापाव खाण्यास दिले तेंव्हा ती थोडेफार बोलू लागली. तिला मराठी भाषा समजत न्हवती ती हिंदी उत्तमरित्या बोलू लागली. आई वडील हयात नाहीत, चाचा आणि चाची यांच्याकडे राहते, गेल्या अनेक दिवसापासून माझा छळ होतोय, वेगवेगळ्या पद्धतीने छळ होतो, खूप मारतात आणि माझा एक डोळा हीं त्यांनी निकामी केला असं तिने यावेळी सांगितलें. कर्नाटक राज्यातील यादगीर या गावाचाहीं तिने उल्लेख केला पण पत्ता किंवा कोणाचा मोबाईल नंबर ती सांगत न्हवती. यां पुढे ती काहीही बोलत न्हवती तेवढ्यात पोलिस गाडी आली.

सहाय्यक पोलिस निरीक्षक पांडुरंग कनेरे,पोलीस सब इन्स्पेक्टर गजानन पुंजरवाड,वाहन चालक खतीब सय्यद आणि एक महिला पोलीस एन एम खापरे आदींचा पथक घटनास्थळी पोहोचला. घाबरलेल्या अवस्थेत असलेली मुस्कान अधिक काही माहिती देत न्हवती त्यावर पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली मुस्कान ला लागलीच धाराशिव जिल्हा महिला व बालकल्याण यांच्या समक्ष हजर करण्यात आले. संबंधित विभागाने मुस्कानशी चर्चा करून तीला नळदुर्ग येथील आपलं घर येथे पालन पोषण व शिक्षणासाठी ठेवण्याबाबत आदेश करण्यात आले. हीं सर्व प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत दुसरा दिवस उजडला होता आणि पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास मुस्कान ला आसरा भेटला ती आपलं घर येथे राहू लागलीय.