व्यापाराने दिले माणुसकीचे दर्शन
सोनसाखळी केली परत : पोलिस अधीक्षकांनी केला गौरव
यवतमाळ -आज च्या युगात काही पैशा साठी , लुबाड फसवणूक असे प्रकार घडत असतात सापडलेली मौल्यवान वस्तू त्याला ज्याची त्याला परत करण्याचे औदार्य म्हणजे जिवंत असल्याचे उदाहरण आहे अशा घटना मधून एक संदेश मिळतो असे प्रतिपादन जिल्हा पोलिस अधीक्षक कुमार यांनी केले.
आर्णी येथील बाजारपेठेत येथील वंदना कांबळे या सोनसाखळी हरवली होती. येथील एका प्रतिष्ठित व्यापारी पालकृतवार यांना सापडली. किंमत 2 लाख रुपये सोन साखळी हरवली म्हणून ती महिला बिचारी हैराण होऊन रडकुंडीला आली हा प्रकार समजताच सागर पालकृतवार यांनी ती सोन साखळी त्या महिलेस परत केली या विषयाची माहिती मिळताच
महागाव येथे भेटीस गेलेल्या जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी 12 मार्च रोजी परत येताना आर्णी पोलीस स्टेशन ला येत त्यांनी सागर पालकृतवार यांना बोलवून त्यांचा सत्कार केला.
प्रतिनिधी कलीम खान यवतमाळ