♦️प्रबोधन, मार्गदर्शन व गावातून निघाली सर्वधर्मसमभाव प्रभात फेरी.
सेलू.. लोकमत न्यूज नेटवर्क. विदर्भातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात २८ वर्षांपूर्वी रंगा विना धुळवड ही आगळीवेगळी ओळख निर्माण करणाऱ्या सेलू तालुक्यातील सुरगाव येथे यंदाही सर्वधर्मसमभाव अभिनव धुलीवंदन सतत तीन दिवस साजरे करण्यात आले. या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक सुरगावचे सप्त खंजिरी वादक प्रवीण महाराज देशमुख यांच्या पुढाकारात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
रंगपंचमीच्या दिवशी भल्या सकाळी गावातून राष्ट्रसंताचा गजर करीत गावातून नामधून निघाली. पंचक्रोशीतील नागरिकासह इतर जिल्ह्यातूनही गुरुदेव प्रेमी सहभागी झाले होते. गाव गेट कमानी व रांगोळी यांनी साजविले होते. प्रत्येकाच्या घरासमोर राष्ट्रसंत व महापुरुषांच्या प्रतिमा ठेवून पूजन करण्यात आले तर गावातील भिंतीही राष्ट्रसंतांच्या सुभाषितांनी बोलक्या झाल्या होत्या. २८ वर्षानंतरही या उपक्रमाचे सातत्य पाहून उपस्थित सर्व भारावून गेले होते. गावातून नामधून कार्यक्रम स्थळी पोचल्यावर ‘सत्संग पर्व’ कार्यक्रम झाला.

समारोपीय कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी इंजिनीयर सप्त खंजिरी वादक भाऊसाहेब थुटे तर पाहुणे म्हणून खासदार अमर काळे, तीवसा मतदार संघाचे आमदार राजेश वानखेडे, किसान अधिकाऱ् अभियानचे अविनाश काकडे, पत्रकार प्रफुल्ल लुंगे, भाजपाचे तालुकाप्रमुख अशोक कलोडे, अवतार मेहेर बाबा केंद्राचे सचिव एम .बी. महाकालकर,शेखर भोयर, मंडळ अधिकारी रमेश भोले, उमेश खापकर ,बा. दे. हांडे ,प्रसिद्ध गायक किशोर करंदे, ऊकेश चंदनखेडे, प्रदीप वानखेडे, गोपालकृष्ण राऊत, योगशिक्षक बाबाराव भोयर, प्रफुल कुकडे, गंगा ताई काकडे, वेनू हांडे, शोभा बेलखोडे, छाया दंडाळे,सुरेखा थूटे, मालती देशमुख यांची उपस्थिती होती.
(बॉक्स…)यांनी केले मार्गदर्शन… या तीन दिवसीय अभिनव धुलिवंदनाच्या समारोपय कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य आयोजक व सप्त खंजिरी वादक प्रवीण महाराज देशमुख यांनी केले. यावेळी खासदार अमर काळे, तिवसा मतदार संघाचेआमदार राजेश वानखेडे, पत्रकार प्रफुल्ल लुंगे, गंगाताई काकडे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन रूपाली रुपेश झाडे, तर आभाप्रदर्शन समीक्षा नेहारे यांनी केले .
(बॉक्स) … प्रबोधन व संस्काराची साखर पेरणी…
तीन दिवसीय अभिनव धुलीवंदन व सर्वधर्मसमभाव कार्यक्रमात विविध विषयावर प्रबोधन व मार्गदर्शन झाले. शेतकरी मेळावा, आरोग्य शिबिर, दान वाटप आदी कार्यक्रमासह अनेक वक्त्यांची विविध विषयावर विचार मंथन झाले.कार्यक्रमाचे मुख्य आयोजक प्रवीण महाराज देशमुख यांच्या सप्त खंजिरी वादनाच्या कार्यक्रमाने रात्री कार्यक्रमाचा समरोप झाला. संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संपूर्ण गावकरी व श्री संत नानाजी महाराज गुरुदेव सेवा मंडळ सुरगाव यांनी परिश्रम घेतले.