अनासूने यांच्या चांगल्या काम कार्याची दखल घेऊन सन्मान पत्र ( चिन्ह ) व रजत पदक देऊन सन्मानित करण्यात आले

छत्रपती संभाजीनगर

मुंबई येथे नुकताच पार पडलेला जागतिक वन दिना निमित्त वन विभाग पदक वितरण सोहळा संपन्न झाला
दिनांक २१ मार्च २०२५ शुक्रवार रोजी ऑडिटोरियम सिडको कनवेन्शन सेंटर सेक्टर ३० वाशी नवी मुंबई येथे हा भव्य दिव्य सोहळा पार पडला


सोपान नारायण अनासूने मु. पो. सावळदबारा तालुका सोयगाव जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथील रहिवाशी असून अनासूने यांची हालाक्याची बिकट गरीबी ची परिस्थिती असून रोज मजुरी करून परिस्थिती वरती मात करून शिक्षण घेऊन वन विभागा मधे वरनरक्षक पदी नोकरी मिळवली आणि चांगले प्रामाणिक पणे काम कार्य करून पूर्ण महाराष्ट्रामधे सावळदबारा गाव चे तसेच स्वतःचे नाव लौकिक करत नाव उंचावले आहे सोपान अनासूने हे सध्याला पुणे येथे वन विभाग येथे वनरक्षक म्हणून कार्यरत आहे मुंबई येथे नुकत्याच पार पडलेल्या पदक सोहळ्या मधे महाराष्ट्र वन विभागातील वन संवरक्षणाच्या प्रभावी काम कार्या बद्दल तसेच वन सेवेतील उत्कृष्ट काम करणारे अधिकारी,कर्मचारी, यांना सन २०२० – २१ ते सन २०२१ – २०२२ व सन २०२२ – २३ वर्षाचे पदक वितरण सोहळा संपन्न झाला या सोहळ्या मधे सोपान नारायण अनासूने यांना सन्मानित करून महाराष्ट्र राज्या चे वन मंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते सन्मान चिन्ह व रजत पदक देऊन सन्मानित करण्यात आले हा पदक सन्मान सोहळा कार्यक्रम वन मंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला तसेच प्रमुख उपस्थिती मधे मिलिंद म्हैसकर भा.प्र.से. अप्पर मुख्य सचिव ( वने ) महसूल व वन विभाग महाराष्ट्र राज्य, शोमिता बिस्वास भा.व.से. प्रधान मुख्य वन संवरक्षक ( वनबल प्रमुख ) म. रा. यांच्या प्रमुख उपस्थित मधे तसेच इतर वरिष्ठ अधिकारी, व कर्मचारी या भव्य दिव्य सोहळ्याला उपस्थित होते सोपान अनासूने यांचे त्यांचे काम कार्या बद्दल तसेच सन्मान झाल्या बद्दल सावळदबारा परिसरामध्ये सर्वत्र कौतुक होत असून अभिनंदन शुभेच्छांचा वर्षाव होत आहे सोपान अनासूने यांनी बोलताना असे ही सांगितले कि मला रजत पदक मिळाले माझ्या नावासहित माझ्या सावळदबारा गाव चे नाव पूर्ण महाराष्ट्र भर उंचावले व सावळदबारा गावचा मी रहिवाशी असल्याचा मला खूप अभिमान आहे असे सांगितले.

N TV न्युज मराठी रिपोर्टर जब्बार तडवी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *