ग्रामीण पोलीस अधीक्षकांच्या आदेशाने गुन्हा दाखल

मुनीर अब्बास शाह खूलताबाद रिपोर्टर

खुलताबाद तालुक्यातील झरी येथील प्रकरणात 15 दिवसापासून न्यायासाठी अनेक वेळा पायपीट व चक्रावर चक्रा मारून देखील खुलताबाद पोलीस स्टेशनला तक्रार दाखिल करण्यासाठी झरी येथील मागासवर्गीय समाजाची महिलेच्या तक्रार दाखल करण्यास टाळाटाळ केली जात होती. प्रकरणात अखेर ग्रामीण पोलिस अधीक्षक यांच्याकडे आंबेडकरवादी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी या प्रकारांना गुन्हा दाखल करण्याचे मागणी केली होती खुलताबाद तालुक्यातील झरी गावात एका मागासवर्गीय समाजाची महिलेला मारहाण, जातिवाचक शिवीगाळ आणि धमक्या दिल्याच्या प्रकरणात अखेर खुलताबाद पोलिसांनी तक्रारीची गंभीर दखल घेतली आहे. ग्रामीण पोलिस अधीक्षकांच्या आदेशा नंतर, आकाश रामदास लोंढे, उषा राम दास लोंढे आणि पूजा आकाश लोंढे यांच्या विरोधात खुलताबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला
आहे.
या घटना २३ फेब्रुवारी २०२५ रोजी पहाटे ४ वाजता घडाली होती पीडित महिलेने लगेचच खुलताबाद पोलीस ठाण्यात तक्रार दिली. मात्र, पोलिसांनी सुरुवातीला तिच्या तक्रारीची दखल घेतली नाही. त्यामुळे या महिलांनी थेट ग्रामीण पोलिस अधीक्षकांकडे तक्रार दाखल दाखल केली. या प्रकारांना एका सामाजिक संघटनांनी या प्रकरणी पाठपुरावा करून न्यायाची मागणी केली. अखेर पोलिस अधीक्षकांच्या आदेशा नंतर खुलताबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात आंबेडकर वादी संघर्ष समितीने मोठ्या प्रमाणात संघर्ष केला. त्यांनी पोलिस अधीक्षक यांना निवेदन देऊन आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली. अखेर समितीच्या संघर्षाला यश आले असून, आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात भारतीय न्याय संहिता २०२३/व अनुसूचित जाती-जमाती.
अत्याचार प्रतिबंधक अधिनियम, १९८९ अंतर्गत शिवीगाळ आणि धमकी, गंभीर दुखापत करण्याचा प्रयत्न, मारहाण, अनुसूचित जाती-जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणाचा पुढील तपास उप विभागीय पोलिस अधिकारी विजय कुमार ठाकूरवाड करत आहेत.

विशेष म्हणजे एका दैनिकांचे पत्रकार खुलताबाद पंचायत समिती कार्यालयात एका तक्रारी संदर्भात माहिती संक्लन करण्यासाठी गेले होते. कुठल्याच प्रकारची माहिती न देत कार्यालय बाहेर जा असे सांगितले पत्रकार यांनी शासकीय कार्यालय आहे या कोणाची खाजगी मालमत्ता नाही असे सांगितले यांनी त्यांच्या विरोधात खुलताबाद पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळे आले म्हणून खोटे नाटे गुन्हा दाखल केले. विशेष म्हणजे या पत्रकार ने खुलताबाद तालुक्यात सुरू असलेले अनेक ठिकाणी सुरू असलेले अवैध धंद्याचे संदर्भात
आपल्या लेखणीचे माध्यमातून नेहमीच बातम्या छापून अवैध धंद्या संदर्भात खुलताबाद पोलीस ठाण्याचे हद्दीत सुरू असलेले अवैध धंदे माध्यमातून खुलताबाद पोलिसांचे पीतल उघडे करत होते.
याचा राग खुलताबाद पोलिसांना व पोलीस निरीक्षक धनंजय फराटे यांना होता.
या अनुषंगाने खुलताबाद पोलिसांनी कोणतेही चौकशी अथवा शहानिशा न करता खोटे गुन्हे दाखल करून घेतले होते.. मात्र पत्रकारांवर खोटे गुन्हे दाखल करण्याचे प्रमाण वाढले आसूण.
पत्रकार यांची तक्रार घेण्यास
ठाणे अंमलदारने सुुहास डबीर याने टाळाटाळ केली.
मात्र खुलताबाद तालुक्यातील झरी येथील एका मागासवर्गीय महिलांना मारहाण झाल्याची तक्रार तब्बल १५ दिवस लागले गुन्हा दाखल करण्यासाठी यासंदर्भात आंबेडकरीवादी संघर्ष समितीचे पदाधिकाऱ्यांनी ग्रामीण पोलीस अधीक्षक विनाय कुमार राठोड यांचेकडे निवेदन देताच दहा मार्च रोजी खुलताबाद पोलीस ठाण्यामध्ये या प्रकरणात गुन्हा दाखल केले आहे
ग्रामीणचे पोलीसअधीक्षक यांनी आदेश देताच खुलताबाद पोलीस ठाण्यात एका प्रराकराची खळबळ ऊडालयाची चित्र पाहावयास मिळत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *