♦️अहिल्यानगर शहरातील तोफखाना, कोतवाली पोलीस ठाणे हददीत अवैध धंद्यामध्ये वाढ झाली आहे. खून, दरोडा, चोरी अशा घटना वाढत आहेत. पूर्वीच्या काळात पोलिसांकडून रात्रीची गस्त घातली जात होती. त्याची नोंद संबधित पोलीस ठाण्यात तसेच विविध कॉलनी मध्ये होत असे मात्र, आता असे होतांना दिसत नाही. त्यामुळे तोफखाना व कोतवाली पोलीस ठाणे हद्दीत अवैध धंदे वाढले आहेत, असा आरोप आमदार जगताप यांनी केला आहे.


♦️कोतवाली व तोफखाना पोलीस ठाणे हद्दीत वाढलेल्या गुन्ह्याबाबत आमदार जगताप यांनी पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची भेट घेतली. त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. पूर्वी रात्री ११ नंतर शहर बंद होत असे मात्र, आता नाईटला परवानगी दिली आहे का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. रात्री तीन ते चार वाजेपर्यंत काही नागरिक तारकपूर, पुणे, माळीवाडा बसस्थानक परिसरात फिरताना दिसत आहे. त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी आमदार जगताप यांनी केली.