LATUR | लातूर महाविकास आघाडी चा घटकपक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे लातूर जिल्हाप्रमुख तसेच महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघ, पुणे चे उपसभापती संतोष सोमवंशी यांची औसा तालुका शेतकरी खरेदी विक्री संघाच्या सभापती पदी व उपसभापती पदी उजनी चे शिवसेना नेते शेखर अण्णा चव्हाण यांची निवड झाल्याबद्दल लातूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने जिल्हाध्यक्ष संजय शेटे यांच्या हस्ते सत्कार समारंभ संपन्न झाला
याप्रसंगी प्रतिकूल परिस्थितीत सामान्य कुटुंबातील एक युवक संतोष सोमवंशी यांनी सहकार क्षेत्रात आपले नाव कमी वेळात नावलौकिक केले आहे यांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे असे मत संजय शेटे यांनी व्यक्त केले
याप्रसंगी पक्षाचे लातूर तालुकाध्यक्ष बख्तावर बागवान, लातूर विधान सभा मतदार संघाचे अध्यक्ष धनंजय देशमुख, उद्योग व व्यापार विभागाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद लोखंडे, कार्यालयीन जिल्हा जिल्हा सरचिटणीस पुरुषोत्तम पाटील, फ्रंटल सेल चे जिल्हा समन्वयक डी.उमाकांत, सफाई कामगार विभागाचे जिल्हाध्यक्ष जाकीर सय्यद, वाहतूक विभागाचे प्रदेश सरचिटणीस दिपक गवळी, ओबीसी विभागाचे लातूर तालुकाध्यक्ष पांडुरंग बेंबडे, अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश सरचिटणीस समीर शेख, प्रा. अंकुश सुर्यवंशी, योगेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *