लातूर प्रतिनिधी –
आज १८/०४/२०२५ रोजी माजी मंत्री तथा सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांचा ७५ व्वा वाढदिवस. आज दिलीपराव देशमुख यांचा संपूर्ण मराठवाड्यात विविध स्पर्धा तसेच सामाजिक उपक्रम हाती घेत वाढदिवस साजरा केला. त्याचप्रमाणे ग्रीन लातुर वृक्षच्या सदस्यांनी दिलीपराव देशमुख यांचा वाढदिवस अनोख्या उपक्रमाचे उदघाट्न करत साजरा करण्याचे ठरवले, तो उपक्रम म्हणजेच शहरात ३०० चिमण्यांचे घरटे बसवण्याचा आहे.
दिलीपराव देशमुख यांनी खूप दिवसापूर्वी पक्षांचे शहरी भागात वास्तव्य फार कमी झाल्याची खंत बोलून दाखवत, वास्तव्य वाढण्या करीता काहीतरी काम झालें पाहिजे असे मत व्यक्त केले होते, मागील दोन दिवसांपासून ग्रीन लातुर वृक्ष फा. सदस्य आणि औद्योगिक प्रशिक्षण केंद्र विद्यार्थी यांनी अथक मेहनत घेत चिमन्यांचे घरटे बनवनेचे काम हाती घेतले होते.
आज दिनांक १८/०४/२०२५ रोजीचे पहाटे ५.३० वाजता दिलीपराव देशमुख यांच्या शुभ हस्ते ७५ घरटयांची पूजा करून पहिले घरटे आशियाना या दिलीपराव देशमुख यांच्या निवासस्थानी लावण्यात आले, सोबतच वाढदिवसाचे औचित्य साधत नांदेड रोड येथे १०० मोठी झाडे लावली. डॉ. भास्कर बोरगावकर यांनी दिलीपराव देशमुख यांचा सत्कार करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
सदर अनोख्या उपक्रमाचे दिलीपराव देशमुख यांनी कौतुक केले, अशा आक्रमक चळवळीची आपल्या लातूरला असलेली गरज तुमच्या कार्याला पाहीले की पूर्ण झाल्याचे समाधान वाटते अशी भावना व्यक्त केली.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉ. पवन लड्डा यांनी केले, तर सदर उपक्रमाची सखोल माहिती ऍड. वैशाली लोंढे यादव यांनी देत माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या, सदर कार्यक्रमास मोठ्या संख्येने ग्रीन लातुर वृक्ष फा. सदस्य उपस्थित होते.
मोमीन हारून
एन टीव्ही न्युज लातूर
9850347529
